Header AD

भिवंडीत टीव्ही पहात असताना मोबाईलवर गेम खेळू नको असे आई रागावल्याने 15 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या...

भिवंडी दि 18 (प्रतिनिधी ) सध्या कोरोनाचे संकट असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू करून घरीच राहण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे घरात राहून कुटुंब टीव्ही किव्हा मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत असल्याने भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून टीव्ही पहात असताना मोबाईलवर गेम खेळू नको असे आई रागावल्याने 15 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना न्यू टावरे कंपाऊंड इथं घडली आहे.             कोमल रविंद्र सलादल्लू वय 15 वर्ष असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती घरामध्ये टीव्ही लावून टीव्ही पहात असताना मोबाईलवर गेम सुद्धा खेळत होती त्यावेळी तीची आई रेखा हिने पाहिले असता कोमल हिच्यावर तीची आई रागावली असता कोमल हिला राग आल्याने ती पहिल्या मजल्यावर जाऊन सिलिंग फॅनला तीची ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे याची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीचा मृतदेह खाली उतरवून इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मुलीच्या आईची कोणतीही तक्रार नसल्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र  सध्या मुले घरीच असल्याने मोबाईलच्या जास्त आहारी जात असल्याने पालकांमध्ये हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे...
भिवंडीत टीव्ही पहात असताना मोबाईलवर गेम खेळू नको असे आई रागावल्याने 15 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या... भिवंडीत टीव्ही पहात असताना मोबाईलवर गेम खेळू नको असे आई रागावल्याने 15 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या... Reviewed by News1 Marathi on April 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads