Header AD

वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा विविध उपक्रमाद्वारे जागर माझे वीजबिल माझी जबाबदारी'
कल्याण , कुणाल म्हात्रे  महावितरणच्या कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीसाठी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. घरगुतीव्यावसायिकऔद्योगिक ग्राहकांसह विविध सरकारी आस्थापनांकडून मार्च महिन्यात जवळपास ११०० कोटी रुपयांचा भरणा अनिवार्य आहे. तर चालू वीजबिल भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांना थकबाकीवर सुमारे ६६ टक्क्यांपर्यंत सूट देणाऱ्या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानाद्वारे ग्राहकांचे प्रबोधन सुरु आहे.


कल्याण पूर्व विभागातील नेतिवली उपविभागीय कार्यालयातून गुरुवारी सकाळी ग्राहक जनजागृतीसाठी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली. मुख्य अभियंता अग्रवाल यांनी स्वतः सहा किलोमीटर सायकल चालवत या रॅलीत सहभाग नोंदवत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्यासमवेत परिमंडल कार्यालयातील सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाडउपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिरप्रणाली विश्लेषक रंजना तिवारी तसेच अधीक्षक अभियंता सुनील काकडेकार्यकारी अभियंते नरेंद्र धवडधनराज बिक्कडदिगंबर राठोड यांच्यासह अधिकारीकर्मचारी व जनमित्र या रॅलीत सहभागी झाले.


वापरलेल्या विजेचे बिल भरण्याची 'माझे वीजबिल माझी जबाबदारीपार पाडण्याचे आवाहन या रॅलीतून करण्यात आले. हाजीमलंग रोडवरील द्वारली गावातील गोलोबा मंदिरात रॅलीचा समारोप झाला. ग्राहकांचे प्रबोधन करून वीजबिल वसुलीचे आव्हान लिलया पेलण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी यावेळी केले. रॅलीच्या आयोजनासाठी उपकार्यकारी अभियंते जितेंद्र प्रजापतीग्यान पानपाटील व नितेश ढोकणे यांनी प्रयत्न केले. 


महाकृषी ऊर्जा पर्व अभियानांतर्गत मुरबाडशहापूरसीएसडीबदलापूर पूर्व आणि पश्चिमविरार पूर्व आणि पश्चिमनालासोपारावसई व वाडा उपविभागात कृषिपंप ग्राहकांचे मेळावेसंपर्क अभियान व प्रबोधनथकबाकीमुक्त ग्राहकांना प्रमाणपत्र वाटपशेतकऱ्यांच्या बांधावर महावितरण आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. कृषिपंप तसेच सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी आपल्या चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून कठीण आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.

वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा विविध उपक्रमाद्वारे जागर माझे वीजबिल माझी जबाबदारी' वीजबिलाच्या वसुलीसाठी  महावितरणचा  विविध  उपक्रमाद्वारे  जागर माझे वीजबिल माझी जबाबदारी' Reviewed by News1 Marathi on March 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads