Header AD

लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल कल्याण पूर्वेतील घटना


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पालिका आयुक्तांनी अनेक निर्बंध लावले अआहेत. असे असतांना देखील  लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन करून गर्दी जमविणाऱ्यांविरोधात महापालिकेने गुन्हा दाखल केला असून हि घटना कल्याण पूर्वेत घडली आहे.


कल्याण पूर्वेतील ६०  फुटी रोडगॅस कंपनी शेजारी येथे बुधवारी संध्याकाळी संपन्न होत असलेल्या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित  असल्याची माहिती ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांना मिळाली. हि माहिती मिळताच त्यांनी आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली असताया विवाह समारंभात  सुमारे ७०० लोकं उपस्थित असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे त्यांनी सोशल डिस्टन्ससिंगचे पालन न करणेतोंडाला मास्क न लावणे अशा प्रकारचे बेजबाबदार पणाचे वर्तन करून कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. 


यामुळे या विवाह सोहळ्याचे आयोजक राजेश यशवंत म्हात्रेचिंचपाडाकल्याण पूर्व आणि  महेश कृष्णा राऊतकासारवडवलीजि. ठाणे यांच्या विरुद्ध भा.द.वि. कलम १८८, २६९, २७० आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१,  तसेच कोविड-१९ उपाययोजना नियम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कल्याण  डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहेअशा परिस्थितीत नागरिकांनी वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना न चुकता मास्कचा वापर करणेसामाजिक अंतर पाळणेया त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल कल्याण पूर्वेतील घटना लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल  कल्याण पूर्वेतील घटना Reviewed by News1 Marathi on March 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads