कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ७८ हजारांचा टप्पा ८८८ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ७८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज ८८८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.
आजच्या या ८८८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७८,२८७ झाली आहे. यामध्ये ८४२७ रुग्ण उपचार घेत असून ६८,६३८रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८८८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१२१, कल्याण प – ३२१, डोंबिवली पूर्व –२७६, डोंबिवली प – १०२, मांडा टिटवाळा – ५२, तर मोहना येथील १६रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment