Header AD

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोरोना प्रतीबंधक कीटचे वाटप

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनापासून बचावासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने नागरिकांना कोरोना प्रतीबंधक कीटचे वाटप करण्यात आले.  


नागरिकांमध्ये कोरोना बाबत पुन्हा एकदा जनजागृती व्हावी आणि कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस व पार्थ पवार फाऊंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष प्रसाद महाजन यांनी कल्याण परीसरात चंदनशिवे नगर, वाडेघर, अन्नपुर्णा नगर, आधारवाडी आदी भागातील नागरिक, दुर्लक्षित घटक, कोरोना योद्धा, पत्रकार, मित्रपरिवार, तसेच विविध ठिकाणी चालताफिरता सर्वसामान्य नागरिकांना कोरोना प्रतीबंधक कीट भेट स्वरुपात देण्यात आले.


या प्रतिबंधक किटमधे अडुळसा कफ सिरप, सॅनिटाइजर, हेल्थ सोप, विटामिन सी टॅबलेट्स पॅक, झिंकोफोल टॅबलेट्स पॅक, फ्रीब्रिथ पॅक (वाफ घेण्यासाठी), पॅरासीमॉल टॅबलेट्स पॅक, आर्सेनिक अल्बम २ पॅक, मास्क ३ आदींचा समावेश आहे. सध्या ५५० किटचे वाटप पुर्ण झाले असुन पुढील काळात अधीक नागरिकांना आणखी कीट उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी सांगितले.  यावेळी महाजन यांच्या मदतीस समाजसेवक संतोष नायरसतिश कासारसमीर सुळे उपस्थित होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोरोना प्रतीबंधक कीटचे वाटप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोरोना प्रतीबंधक कीटचे वाटप Reviewed by News1 Marathi on March 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads