Header AD

महागडे संगणकीय कार्ड चोरी करणाऱ्या दोघाना अटक
भिवंडी :दि.३ ( प्रतिनिधी ) भिवंडीतील सरवली व सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यात घरफोडी करून तेथील महागडे संगणकीय कार्ड चोरी करणाऱ्या दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे. तपासात कोनगाव सह भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अशा तीन घरफोडी उघडकीस आणून त्यांच्या जवळून ४४ लाखांचे कार्ड जप्त करण्यात यश मिळविले आहे .


          कोनगाव पोलीस ठाणे क्षेत्रातील  सपना इंडस्ट्रीयल इस्टेट ,सरवली येथील कपिल रेयॉन (इंडिया ) या यंत्रमाग कारखान्याचे शटर उचकटून तेथील एअरजेट पिकानॉल सुमम लूम मशीन मधील १८ लाख रुपये किमतीचे ७२ इलेक्ट्रिक कार्ड चोरी केल्या बाबत गुन्हा दाखल होत तर त्या पूर्वी त्याच परिसरात ४ फेब्रुवारी रोजी के जी सिल्क मिल्स टेक्स्टाईल्स कंपनी मध्ये घरफोडी करून २४ लाख रुपयांचे १२० इलेक्ट्रिक कार्ड चोरी केल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल होते .            घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण ,सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले ,वरिष्ठ पोलीस निरीक्षसक गसंपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजित पाटील, किरण वाघ,पो उप नि.पराग भाट, पोलीस कर्मचारी वामन सूर्यवंशी,राजेश शिंदे,संतोष मोरे,संतोष पवार,विनायक मासरे, नरेंद्र पाटील,गणेश चोरगे,कृष्णा महाले, अविनाश पाटील,अशोक ढवळे,विजय ताठे यांच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या मदतीने कमलेश माताप्रसाद मिश्रा व जितेंद्र उमा महतो मूळ रा.उत्तरप्रदेश या दोघा संशयितांना दिवा ठाणे येथून ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले असतानाच भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अरटेज फब्स लि. सोनाळे येथील कंपनीतील ५ लाख ३० हजार रुपये किमतीचे ५३ इलेक्ट्रिक कार्ड घरफोडी गुन्ह्याची उकल करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे .            त्या सोबत अटक केलेल्या जितेंद्र उमा महतो या आरोपी विरोधात गुजरात राज्यात तीन ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये तो फरार आहे .या कामगिरी मुळे घरफोडीच्या तीन गुन्ह्यांची उकल करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले असून सदर आरोपींना ८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी असून गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील हे करीत आहेत .
महागडे संगणकीय कार्ड चोरी करणाऱ्या दोघाना अटक  महागडे संगणकीय कार्ड चोरी करणाऱ्या दोघाना अटक Reviewed by News1 Marathi on March 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads