Header AD

डोंबिवली तील चिमणी प्रेमीचे `चिमणी बचाव`जन जागृती साठी प्रयत्न कृत्रिम घरटे लावण्याची विनंती


 


डोंबिवलीत ( शंकर जाधव  )  सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली.या पार्श्वभूमीवर चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयीच्या जागृतीसाठी २०१० सालापासून २० मार्च हा दिवस  जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरला.जगभरातील लोककथा आणि चिऊताई चिऊताई दार उघड’ सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव चिमणी गेली कुठेअसा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला.पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.डोंबिवलीतील चिमणी प्रेमी शैलेश भगत हे गेली अनेक वर्ष` चिमणी बचाव`जनजागृती करत आहेत.यासाठी त्यांनी नागरिकांना आपल्या घराच्या बालकनीत कृत्रिम घरटे लावण्याची विनंती केली आहे.

     

 

          याबाबत चिमणी प्रेमी शैलेश भगत म्हणाले, डोंबिवलीत चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा दिवस अलीकडे फारसा अनुभवता येत नाही.आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणाराविणीचा हंगाम वर्षभर असू शकणारामाणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु आता तिच्यासाठी अंगण नाहीझाडं नाहीतवळचणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घरटय़ासाठी छोटीशी जागाही नाही. अनेक वर्षांनी जगभरचतज्ज्ञांच्या अभ्यासाअंती चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातो. 
            भारतात नाशिक येथील नेचर फॉरएव्हर सोसायटीचे संस्थापक आणि निसर्गरक्षक मोहम्मद दिलावर आणि फ्रान्समधील इकोसिस अ‍ॅक्शन फाऊंडेशन’ या संस्थांनीइतर स्वयंसेवी संस्थांसह – चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास केला. चिमण्यांना मदत करण्यास सुरुवात केली आणि चिमण्यांची कमी होणारी संख्या हा वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे कायहे तपासून पाहण्यासाठी जगभर चळवळ उभारली.डोंबिवलीत चिमण्याचे घरटे लाव्ण्यासाठी अनेकजन माझ्याकडे चौकशी करतअसतात.यावरून डोंबिवलीकर चिमणीप्रेमी आहेत हे दिसून येते.दरम्यान शनिवारी सकाळपासून चिमणी प्रेमी भगत हे त्यांचे सहकारी प्रशांत रेड्डीज यांच्यासमवेत हे जनजागृती करत होते.

डोंबिवली तील चिमणी प्रेमीचे `चिमणी बचाव`जन जागृती साठी प्रयत्न कृत्रिम घरटे लावण्याची विनंती डोंबिवली तील चिमणी प्रेमीचे `चिमणी बचाव`जन जागृती साठी प्रयत्न  कृत्रिम घरटे लावण्याची विनंती  Reviewed by News1 Marathi on March 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads