Header AD

आयत्या बिळावर नागोबा' होण्याची मनसेची जुनी सवय शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची टिका

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : 'आयत्या  बिळावर नागोबाहोण्याची मनसेची ही जुनीच सवय असल्याची टिका कल्याण पश्चिमचे  आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. कल्याणच्या वडवली पुलाचे मनसेने लोकार्पण केल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.वडवली -आंबिवलीला जोडणाऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले असून सोमवारी त्याचे लोकार्पण केले जाणार होते.  मात्र काही तांत्रिक बाबींमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. नेमकी हीच संधी साधत मनसेने सोमवारी संध्याकाळी गनिमीकाव्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. यावरून शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी मनसेवर निशाणा साधत शिवसेनेच्या कामाचे श्रेय घ्यायचे ही मनसे आमदार राजू पाटील यांची जुनी सवय असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच केवळ लोकांचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने केलेला हा स्टंट असल्याचेही आमदार भोईर यावेळी म्हणाले.


 हा उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी भूसंपादनाचा महत्वाची अडचण होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तर मनसे एवढे दिवस काय झोपा काढत होती का१२ वर्षे कोणतेही आंदोलन नाही की पत्रव्यवहार नाही. शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायचे ही त्यांची जुनीच खोड असल्याचे सांगत आमदार विश्वनाथ भोईर यांनी मनसेवर हल्ला चढवला.

आयत्या बिळावर नागोबा' होण्याची मनसेची जुनी सवय शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची टिका आयत्या बिळावर नागोबा' होण्याची मनसेची जुनी सवय शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची टिका Reviewed by News1 Marathi on March 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads