Header AD

दरवर्षी पावसाळ्यात ठाणे बाजारपेठेत साठणारे पाणी थांबणार !

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मासुंदा तलाव ते जाफर नाला पर्यंत कलव्हर्ट चे भूमिपूजन..


ठाणे,  प्रतिनिधी  :–  मासुंदा तलाव ते जाफर नाला पर्यंत कलव्हर्ट च्या कामाचे भूमिपूजन आज खासदार राजन विचारे यांच्या उपस्थित करण्यात आले. त्यावेळी स्थानिक नगरसेवक श्री. सुधीर कोकाटे, नगरसेविका व उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ, मा. नगरसेवक पावन कदम, विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, विभागप्रमुख कमलेश चव्हाण, कमलेश श्रीमाळ, उप विभागप्रमुख अज्जू देहेरकर, शशिकांत गुरव, शाखाप्रमुख वैभव ठाकूर, राजू ढमाले, सुशांत उतेकर, ठाणे महानगरपालिकेचे उप कार्यकारी अभियंता भगवान शिंदे व इतर अधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शहराच्या मध्यभागी असलेल्या मासुंदा तलाव हा दरवर्षी पावसाळ्यात भरून ओसांडून वाहू लागतो. त्यावेळी तलावातील पाणी शेजारी असलेल्या बाजारपेठेमध्ये घुसून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. त्याचा त्रास नागरिकांना होत असतो हे टाळण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी मासुंदा तलाव ते जाफर नाला पर्यंत अरूंद असलेला कलव्हर्ट मोठा करून पाणी खाडीमार्गे सोडण्यासाठी या कामाला मंजुरी मिळवली आहे. त्यांच्याच प्रयत्नाने आज या ठिकाणी या कामाची सुरुवात झाली आहे. खासदार राजन विचारे यांनी दरवर्षी बाजारपेठ मध्ये व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी सतत प्रयत्नशील असायचे. 


त्यासाठी अधिकाऱ्यांना याबाबत काय करता येईल याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. परंतु या कामासाठी निधीची आवश्यकता असल्या कारणाने तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल असताना दि. १३/११/२०१९ रोजी भेट घेऊन व्यथा मांडली. आयुक्तांनी या कामाचे गांभीर्य ओळखून तात्काळ ६० लाख निधी मंजूर करून कामास सुरुवात केली. या कामासाठी लागणारी वाहतूक शाखेची परवानगीही पोलीस उपयुक्त श्री. बाळासाहेब पाटील यांच्याकडून मिळवून घेतली. आज या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. 


त्यावेळी प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीला अडथला ठरणार नाही अशा प्रकारे काम करून घ्यावे अशा सूचना वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे बाजार पेठ मधील व्यापारी संघटनेच्यावतीने खासदार राजन विचारे यांचे जाहीर आभार मानले.

दरवर्षी पावसाळ्यात ठाणे बाजारपेठेत साठणारे पाणी थांबणार ! दरवर्षी पावसाळ्यात ठाणे बाजारपेठेत साठणारे पाणी थांबणार ! Reviewed by News1 Marathi on March 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads