Header AD

थकबाकी दारांचे वीज मीटर कापू नका नागरिकांना बिले भरण्यास मुदत द्या डोंबिवली मनसे कडून विज वितरण कार्यालयाला धडक..


 

डोंबिवली ( शंकर जाधव ) २०२० साली कोरोनाने थैमान घातले होते.या वर्षात लॉकडून केल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहीचे व्यवसायह ठप्प झाले.मात्र सरकारने सामान्य जनतेच्या आर्थिक परिस्थितीबाबत विचार न करता भरमसाथ विजे बिले आकारल्याने नागरिकांनी महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली.२०२१ च्या मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने बेरोजगारीत आणखीच वाढ झाली आहे.
          एकीकडे आपले आरोग्य सांभाळायचे आणि दुसरीकडे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी नोकरी करायची असे असताना थकबाकीदारांचे वीज मीटर कापण्याची स्थगिती उठवून हे सरकार एकप्रकारे अन्याय करत असल्याची ओरड सुरु झाली आहे.याबाबत मनसेने जनतेची बाजू मांडत थकबाकीदारांचे वीजमीटर कापू नका... नागरिकांना बिले भरण्यासाठी मुदत द्या अशी मागणी केली आहे.डोंबिवली पश्चिमेकडील आनंदनगर येथील वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली.    


 

   

        डोंबिवली मनसेच्या विविध शाखेत विजग्राहकांच्या वाढीव विजबिल व विजमीटर कापण्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या याची दखल घेत कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली उपशहर अध्यक्ष राजू सदू पाटीलमहिला शहर संघटक सुमेधा थत्तेशहर सचिव अरुण जांभळेमहिला उपशहर अध्यक्ष नीलिमा भोईर,श्रध्दा किर्वेशाखाध्यक्ष केतन सावंत, महेश पांचाळ, सुधीर सप्रे,नंदकिशोर भोसले, आश्विन पाटील महिला शाखाध्यक्षा प्रिया कडूशर्मिला लोंढे,शिवानी दळवीमहाराष्ट्र सैनिक स्वप्नील निकम,सुप्रिया साळवी यांनी डोंबिवली पश्चिमेतील विज वितरण कार्यालयाला भेट देवून मुख्य अभियंता पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष भोईर म्हणाले,ज्यांची खरोखरच आर्थिक अडचण आहे, त्यांच्याकडून एकरकमी बिल न मागता हप्त्याहप्तेची मुदत द्यावी तर  शहरअध्यक्ष घरत म्हणाले, कोरोनाच्या काळात जनता चारही बाजूने त्रासलेली असताना परस्पर विजमीटर न कापता माणुसकीच्या भावनेने सहकार्य करावे.

 


थकबाकी दारांचे वीज मीटर कापू नका नागरिकांना बिले भरण्यास मुदत द्या डोंबिवली मनसे कडून विज वितरण कार्यालयाला धडक.. थकबाकी दारांचे वीज मीटर कापू नका नागरिकांना बिले भरण्यास मुदत द्या डोंबिवली मनसे कडून विज वितरण कार्यालयाला धडक.. Reviewed by News1 Marathi on March 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads