Header AD

कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा वार्ड बॉयने केला विनयभंग केडीएमसीच्या जंबो कोविड सेंटरमधील प्रकार

 


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  दोन दिवसा पूर्वी सुरु झालेल्या केडीएमसीच जंबो कोविड सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी वार्डबॉयचा शोध सुरू केला आहे. एका समाजसेवकाच्या पुढाकाराने हा प्रकार उघडकीस आला आहे.


कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या आधी कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. काही महिन्यापूर्वी कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरातील आर्ट गॅलरीत जंबो कोविड सेंटर तयार करण्यात आले. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे कोविड सेंटर तयार होऊन पडून होते. आत्ता कोरोना रुग्ण वाढत असल्याने हे सेंटर दोन दिवसापूर्वी सुरु करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये दोन दिवसापूर्वी प्रसूती झालेली एक महिला ही कोविड पॉझीटीव्ह झाल्याने उपचारासाठी दाखल झाली. या महिलेचा सेंटरमधील एका कर्मचा:याने विनयभंग केला.


महिलेने हा सगळा प्रकार महिला डॉक्टरसह तिच्या पतीला फोन वर कळविला. समाजसेवक अजय सावंत यांच्या पुढाकाराने हे प्रकरण बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोहचले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण यांचे म्हणणे आहे कीसदर घटनेसंदर्भात पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी श्रीकांत मोहिते याला लवकरात लवकर अटक केली जाईल. हा वॉर्डबॉय खाजगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु आम्ही तपास करणार आहोत आरोपी श्रीकांत मोहिते याचा शोध सुरु आहे.


 हा प्रकार कोविड सेंटरमध्ये घडला असून हे अतिशय दुदैवी आहे. महिला वार्डात महिला कर्मचारी नियुक्त केले गेले पाहिजे. पोलिसांनी विनयभंग करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी समाजसेवक अजय सावंत यांनी केली आहे.
कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा वार्ड बॉयने केला विनयभंग केडीएमसीच्या जंबो कोविड सेंटरमधील प्रकार कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा वार्ड बॉयने केला विनयभंग केडीएमसीच्या जंबो कोविड सेंटरमधील प्रकार Reviewed by News1 Marathi on March 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads