Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्ण हजारच्या उंबर ठ्यावर


कोरोना रुग्णांनी ओलांडला ७३ हजारांचा टप्पा सर्वाधिक ९८७ नवीन रुग्ण तर ४ मृत्यू ..


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून  कोरोना रुग्णांनी ७३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर आली असून तब्बल ९८७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत २४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चार मृत्यू झाले आहे. 

      आजच्या या ९८७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७३,८०८ झाली आहे. यामध्ये ६६७१ रुग्ण उपचार घेत असून ६५,९३१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९८७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१५५कल्याण प – ३३०डोंबिवली पूर्व ३१६डोंबिवली प – ११०मांडा टिटवाळा – ५७ मोहना – १७, तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्ण हजारच्या उंबर ठ्यावर कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्ण हजारच्या उंबर ठ्यावर Reviewed by News1 Marathi on March 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads