Header AD

शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित : ४ खासगी रूग्णालयातही लसीकरण सुरू

 

■महिला दिनानिमित्त ५ केंद्रांवर महिलांसाठी विशेष लसीकरण..


ठाणे, प्रतिनिधी  :  केंद्र  व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांचे वेळेत लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलीं असून ४ खासगी रूग्णालयातही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दरम्यान जागतिक महिलादिनाच्या औचित्य साधून शहरात आजच्या दिवशी पाच लसीकरण केंद्रांवर महिलांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात आली होती. 


      शासनाच्या निर्देशानुसार शहरातील ६० वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांचे लसीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य  केंद्रांसोबत खाजगी हॉस्पिटलचा देखील या लसीकरण मोहिमेत समावेश केला आहे. यामध्ये महापालिकेच्यावतीने शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलीं आहेत. या सर्व ठिकाणी सर्वच लाभार्थ्यांना वेळेत लस मिळावी तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आता नवीन ४ खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील लसीकरण केंद्रे लुरू करण्यात आली आहेत. 

      

          महापालिकेच्यावतीने ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पोस्ट कोव्हीड सेंटर, मेंटल हॉस्पिटल, कौसा हॉस्पिटल, हाजुरी, सह्याद्री, आंबेडकर भवन, वाडिया, किसननगर, रोसा गार्डेनिया,कौसा आरोग्य केंद्र, कोपरी मॅटर्निटी, अतकोनेश्वर आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर,आझाद नगर आरोग्य केंद्र, बाळकूम आरोग्य केंद्र, सी आर वाडिया आरोग्य केंद्र, गांधी नगर, कळवा,कौसा आरोग्य केंद्र, किसन नगर, लक्ष्मी  चिराग नगर आरोग्य केंद्र,  लोकमान्य कोरेस आरोग्य केंद्र. माजिवडा आरोग्य केंद्र, मनोरमानगर, मानपाडा, नौपाडा, शीळ आरोग्य केंद्र, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, सावरकर नगर आरोग्य केंद्र आणि आनंदनगर आरोग्य केंद्र आदी ठिकाणांचा समावेश आहे. 

          

          खाजगी रूग्णालयांमध्ये सिद्धिविनायक रुग्णालय, वेदांत हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल,  काळसेकर रुग्णालय,प्राइम होरायझन हॉस्पिटल, हायवे हॉस्पिटल, पिनॅकल ऑर्थोकेअर हॉस्पिटल, हाईलँड हॉस्पिटल आणि  कौशल्य रुग्णालय आदी रुग्णालयांचा समावेश आहे. 


दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज पाच लसीकरण केंदेरांवर महिलांसाठी विशेष सुविधा पुरविण्यात आली होती. यामध्ये सी. आर. वाडिया, किसननगर आरोग्य केंद्र, लोकमान्य आरोग्य केंद्र, कोरस, रोझा गार्डिनिया आणि कौसा आरोग्य केंद्र आदींचा समावेश होता.शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित : ४ खासगी रूग्णालयातही लसीकरण सुरू शहरात ३६ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित : ४ खासगी रूग्णालयातही लसीकरण सुरू Reviewed by News1 Marathi on March 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

विस्तीर्ण हद्दीमुळे मानपाडा पोलीस ठाण्यावर ताण, मानपाडा ठाण्याच्या विभाजनासाठी प्रयत्न करणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

    डोंबिवली ( शंकर जाधव ) खासदार श्रीकांत शिंदे यांनी  मानपाडा पोलीस ठाण्यात भेट घेत घटनेची माहिती घेतली .यावेळी खासदार शिंदे यांनी पोलिसां...

Post AD

home ads