Header AD

वीट भट्टी वरील कामगारांना कपड्यांचे वाटप दिशान फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : समाजातील विविध प्रश्नांवर दिशान फाउंडेशन गेल्या काही काळापासून काम करत आहे. फाउंडेशनच्या माध्यमाने नागरिकांकडुन कपडे जमा करण्यात आले होते. जमा झालेल्या कपड्याचे वर्गीकरण करून नुकतेच मामणोली येथील वीटभट्टीवरील कामगारांना हे कपडे वाटप करण्यात आले. कल्याण शहरांतील टीम परिवर्तनच्या मदतीने दिशान फाउंडेशनने हा उपक्रम राबविला. यावेळीं दिशान फाउंडेशनचे चमनदीप सिंग विर्दीइंद्रगरवेश सिंगमौमिता कौर विर्दी आणि टीम परिवर्तनचे अविनाश पाटील उपस्थित होते.


दिशान फाउंडेशनच्या डायरेक्टर आणि सफल शिक्षक प्रशिक्षणच्या पुनम लिलावत यांचे या मोहिमेसाठी विशेष सहकार्य मिळाले. यावेळीं युवा संस्कार बहुउद्देशीय संस्थेचे सोमनाथ राऊत देखील उपस्थित होते. टिटवाळा परिसरातील आदिवासी महिलांसाठी लवकरच सॅनिटरी पॅड वाटप करण्याचा आमचा मानस आहे असे मौमिता कौर विर्दी यांनी यावेळीं सांगितले.

वीट भट्टी वरील कामगारांना कपड्यांचे वाटप दिशान फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम वीट भट्टी वरील कामगारांना कपड्यांचे वाटप दिशान फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम Reviewed by News1 Marathi on March 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads