Header AD

दुर्गा फाउंडेशनने केला महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कोरोना काळात जिवाची पर्वा न करता कौटुंबिक जीवन बाजूला ठेवून समाजावर आलेल्या आपत्तीच्या संकटात अनेक महिला अहोरात्र मेहनत करत आहेत. त्यांचे योगदान संपुर्ण देश स्मरणात ठेवणार असून त्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून करावे गाव येथील दुर्गा फाऊंडेशनच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा त्यांच्या जनसेवेबददल कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. दुर्गा फाउंडेशनच्या संस्थापक शोभा भोईर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी महीलांना "महीला सुरक्षा" व इतर विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कमलेश पटेल, उर्मिला ताबीब यांनी देखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कोरोना योद्धा डॉ. निवेदिता म्हाञे, डॉ. प्राजक्ता जोशी, डॉ. प्रगती येलवणकर, पोलिस नाईक मालिनी म्हाञे, सुमन भोईरपोलिस शिपाई ललिता पवार, पोलिस पाटील पाळी सुजाता पाटील,  दया दहीवडे आदींना दुर्गा फाऊंडेशन तर्फे कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.


       दुर्गा फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभा भोईर, हेमलता खंदारे, रसिका म्हात्रे, अक्षता केणी, ज्योती चीवे, सुजाता गुरव, सारिका ठाकूर, सुनंदा भापकर आदींसह इतर महिला यावेळी उपस्थित होत्या. 

दुर्गा फाउंडेशनने केला महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान दुर्गा फाउंडेशनने केला महिला कोरोना योद्ध्यांचा सन्मान  Reviewed by News1 Marathi on March 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads