Header AD

धामणकर नाका उड्डाण पुलावरील खड्ड्यांवर मनपा प्रशासनाचे दुर्लक्षभिवंडी दि. २४ (प्रतिनिधी  ) शहरातील धामणकर नाका उड्डाणपुलाच्या चढ उताराच्या दोन्ही बाजूंना खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र मनपा प्रशासनाचे उड्डाणपुलावर पडलेल्या या खड्ड्यांकडे पुरता दुर्लक्ष होतांना दिसत आहे. 
                  शहरातील सर्वात पहिला धामणकर नाका उड्डाणपूल मेट्रो मार्गामुळे तोडण्यात येणार असल्याचे समजते, त्यातच या उड्डाणपूला पर्यंत मेट्रोचे काम देखील येऊन ठेपले आहे. मेट्रो प्रकापाच्या कामामुळे अंजुरफाटा ते धामणकर नाका रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहन चालकांना अगोदरच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी वाहन चालक आपली वाहने उड्डाणपुलावरून नेतात मात्र या उड्डाणपुलावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.           विशेष म्हणजे या खड्ड्यांमध्ये अनेकवेळा दुचाकी घसरून अपघात होत आहेत मात्र त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, भविष्यात या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण असा सुज्ञ नागरिक विचारात आहेत. तर दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी डांबरीकरण व रस्ते दुरुस्ती होत असतांना देखील धामणकर नाका उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांकडे मनपा प्रशासन डोळेझाक का करते, असा सवाल निर्माण झाला आहे. 
धामणकर नाका उड्डाण पुलावरील खड्ड्यांवर मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष धामणकर नाका उड्डाण पुलावरील खड्ड्यांवर मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष Reviewed by News1 Marathi on March 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads