Header AD

कल्याणच्या परेशने एलिफंटा ते 'गेटवे ऑफ इंडिया अंतर चार तासात पोहून केले पार
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याणच्या १४ वर्षीय परेश विजय पाटील या मुलाने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ किलोमीटरचे अंतर चार तासात पोहून पार केले आहे.  


 आजच्या मोबाईलइंटरनेटच्या काळात अगदी लहान लहान मुलं विविध आजारांना सामोरी जाताना दिसतात. आजच्या जीवनशैलीमुळे मैदानी खेळ संपत चाललेत की कायअसं वाटायला लागलं आहे. अशा परिस्थितीत योग्य व्यायाम व वेळेचे नियोजन केलं तर आपलं स्वास्थ्य उत्तम ठेवू शकतो हे परेश पाटील याने सिद्ध करून दाखवले आहे. एलिफंटा ते 'गेटवे ऑफ इंडियाहे १४ कि.मी. अंतर पोहून चार तासांत पार केलं आहे. या प्रवासात सागरी लाटासागरी जीव यांच्या पासून आपला बचाव करत हे अंतर शर्तीने पूर्ण केले आहे. त्याची रोजची शिस्त आणि मेहनत ह्या साहसातून दाखवली आहे.


      सामन्य घरातील असलेल्या परेशचे वडील विजय पाटील हे रेल्वे आरपीएफ मध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. तर आई गृहिणी आहे. परेशच्या या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून कल्याणचे नाव लौकिक केल्या बद्दल मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी त्याचा विशेष सत्कार देखील केला आहे.

कल्याणच्या परेशने एलिफंटा ते 'गेटवे ऑफ इंडिया अंतर चार तासात पोहून केले पार कल्याणच्या परेशने एलिफंटा ते 'गेटवे ऑफ इंडिया अंतर चार तासात पोहून केले पार  Reviewed by News1 Marathi on March 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads