Header AD

कुष्‍ठरोग वसाहती तील महिलांना केडीएमसीची अनोखी भेट महिला दिना निमित्‍त शिलाई मशीनचे केले वाटप

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  जागतिक महिला दिनानिमित्‍त कल्याण पूर्व येथील कुष्ठरोग वसाहतीतील महिलांना महानगरपालिका आणि बॅंक ऑफ बडोदा यांच्‍या संयुक्‍त विदयमाने शिलाई मशीनचे वाटप करुन एक अनोखी भेट देण्यात आली.


कुष्ठरोग वसाहतीतील गजानन माने यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना कुष्ठरोग वसाहतीतील प्रशिक्षित महिलांची माहिती दिल्यानंतर सदर महिलांना मदत करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आणि तातडीने महिला दिनी शिलाई मशिनचे वाटप करण्याच्या अनुषंगाने कल्याण मधिल बँक ऑफ बडोदा यांची मदत घेवून आज एकुण १८ प्रशिक्षित महिलांना शिलाई मशिन दिल्यावर सदर महिलांच्या चेह-यावरील आनंद द्विगुणित झालेला दिसून आला. शिलाई मशिन दिल्यामुळे ख-या अर्थाने कुष्ठरोग वसाहतीतील महिलांचा महिला दिन आज साजरा झालाअसे उद्दगार पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाप्रसंगी काढले.


यावेळी बँक ऑफ बडोदाचे कल्याणमधील व्यवस्थापक के. शनमुघेवेलनमहापालिका उपआयुक्त अनंत कदमपरिवहन सभापती मनोज चौधरीस्थानिक नगरसेविका रेखा चौधरीसहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळेमहिला व बाल कल्याण विभागाच्या स्वाती गरुड तसेच कुष्ठरोग वसाहतीतील प्रदीप गायकवाड यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

कुष्‍ठरोग वसाहती तील महिलांना केडीएमसीची अनोखी भेट महिला दिना निमित्‍त शिलाई मशीनचे केले वाटप कुष्‍ठरोग वसाहती तील महिलांना केडीएमसीची अनोखी भेट   महिला दिना निमित्‍त शिलाई मशीनचे केले वाटप Reviewed by News1 Marathi on March 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads