Header AD

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ सीसी टीव्हीचे लोकार्पण




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याण मधील वालधुनी येथील शिवभक्तांना व नागरिकांना धर्मवीर प्रतिष्ठान तर्फे एक अनोखी भेट देण्यात आली.


वालधुनी विभागातील धर्मवीर प्रतिष्ठान तर्फे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला असून सदर परिसर हा सुरक्षित करण्यात आला आहे. याकामासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांचे सहकार्य लाभले असून धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश उगले आणि सचिव कैलाश आडोळे यांच्या सौजन्याने हे काम करण्यात आले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होऊ नये आणि आजूबाजूचा परिसर देखील सुरक्षित रहावा यासाठी याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असल्याची माहिती सतीश उगले यांनी दिली.  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ सीसी टीव्हीचे लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ सीसी टीव्हीचे लोकार्पण Reviewed by News1 Marathi on March 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads