Header AD

शर्जिल उस्मानीला त्वरित अटक करण्याची भाजयु मोची मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) हिंदूबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शर्जिल उस्मानीला त्वरित अटक करा व त्याच्यावर २९५ अ, इतर लागू होणारे तत्सम गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजयुमोने तहसीलदार दीपक काकडे यांच्याकडे निवेद्नादवारे केली आहे.भाजयुमो प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांच्या माध्यमातून पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल केले होते. 


       सदर विषय गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांच्यावर २९५ अ व इतर तत्सम गुन्हे दाखल करणे ही अपेक्षित होते   अश्या हिंदू द्वेष्ट्या धर्मांध शक्तींना पाठीशी घालणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून जाहीर निषेध करत उस्मानीला त्वरीत अटक करून त्याच्यावर २९५ अ आणि लागू होणारी तत्सम सर्व कलमे लावावीत असे अशी मागणी करण्यात यावेळी करण्यात आली.


      यावेळी भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष  मिहिर देसाई, जिल्हा पदाधिकारी  स्वप्निल पाटील, अथर्व ताडफळे, राहुल सकपाळ, गौरव देसाई अन्वेष जोशी, तेजस केम्बारे, अपूर्व कदम, सौरभ सिंग, राणा सिंग, वैभव सावंत, चेवन गिरी इ. उपस्थित होते.

शर्जिल उस्मानीला त्वरित अटक करण्याची भाजयु मोची मागणी शर्जिल उस्मानीला त्वरित अटक करण्याची भाजयु मोची मागणी Reviewed by News1 Marathi on March 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads