Header AD

टिटवाळा नजीक मृत प्राणी आणि पक्षी आढळल्याने खळबळ
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण  ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत टिटवाळा नजीक जावई पाडा परिसरात एकाच वेळेला अनेक मृत पक्षी प्राणी आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. आजूबाजूच्या परिसरात उग्र वास येऊ लागल्याने येथील नागरिकांनी पाहणी केले असता त्यांना बाजूला असलेल्या झाडाझुडपात काही पक्षी आणि प्राणी मरून पडल्याचे आढळून आले. याबाबत प्राणीमित्र संघटनेला कळवल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत सविस्तर वृत्त असे की टिटवाळा मंदिर परिसराच्या मागे असलेल्या जावई पाडा या ठिकाणी परिसरात उग्र वास पसरल्याने येथील नागरीकांनी आजूबाजूला पाहणी केली असता थारवानी रेसिडेन्सी कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या झाडीतून उग्र वास येत असल्याचे आढळून आले. अधिक जवळ जाऊन पाहणी केली असता  त्या ठिकाणी एकाचवेळी ७ कुत्रे, पाच कावळे आणि  काही कोंबड्या मरून पडल्याचे आढळून आले. या पक्ष्यांना व प्राणांना विषबाधा झाला असल्याचा अथवा कोणीतरी जाणीव पूर्वक अन्नातून विष दिले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  


यानंतर परिसरातील नागरिकांनी वॉर या प्राणीमित्र म्हणून काम करणाऱ्या संस्थेला याबाबत माहिती दिली. प्राणीमित्र संस्थेच्या सदस्यांनी  या ठिकाणी पाहणे करुन या प्रकाराविषयी टिटवाळा पोलीस स्थानकात माहिते दिली . त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिटवाळा नजीक मृत प्राणी आणि पक्षी आढळल्याने खळबळ टिटवाळा नजीक  मृत प्राणी आणि पक्षी आढळल्याने खळबळ Reviewed by News1 Marathi on March 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads