Header AD

भिवंडी एसटी स्थानक ते नागांव रस्त्याचे काम ऊत्तम झाल्याने महापालिका आयुक्तांचा काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनंता पाटील यांनी केला सत्कार..

भिवंडी दि 16 (प्रतिनिधी ) गेल्या पंधरावर्षांपासून शहरातील भिवंडी एसटी स्थानक ते नागांव गावठाण (गायत्रीनगर)  रस्त्याचे रखडलेले काम पालिका प्रशासनाकडून उत्कृष्ट झाल्याने भिवंडी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनंता पाटील यांनी सोमवारी नागरिकांच्यावतीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांची भेट घेतली आणि त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. भिवंडी शहरातील नागांव गावठाण रोडचे काम गेल्या सतरा वर्षांपासून रखडलेले होते.२ किमी.लांबी व ६० फूट रुंदीचा रस्ता पालिका प्रशासनाने लवकरात लवकर तयार करावा व नागरिकांचा प्रवास सुखकर करावा यासाठी स्थानिक राजकीय पुढारी व नागरिक सतत प्रयत्नशील होते.मात्र त्यात यश येत नव्हते.अखेर भिवंडी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनंता पाटील यांनी मागील तीन वर्षांपासून पालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून रस्त्याचे काम उत्कृष्टरित्या तयार करून घेतले आहे.एमएमआरडीएच्या अर्थसहाय्यातून १५ कोटी रुपये खर्च करून पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया ,शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड ,उपअभियंता संदीप सोमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या बांधकाम विभागाने एसटी स्थानक ते नागांव गावठाण (गायत्रीनगर) या रखडलेल्या रस्त्याचे बांधकाम उत्कृष्टरित्या पूर्ण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षा ,दुचाकी ,चार चाकी वाहनांचा प्रवास सुखमय झाल्याने प्रवाश्यांसाह नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.भविष्यात नागरी सुविधांमध्ये पालिकेकडून काही अडचणी निर्माण झाल्यास माझ्याशी संपर्क साधावा. त्या तात्काळ मार्गी लावल्या जातील असे आश्वासन पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिल्याने भिवंडी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनंता पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.
भिवंडी एसटी स्थानक ते नागांव रस्त्याचे काम ऊत्तम झाल्याने महापालिका आयुक्तांचा काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनंता पाटील यांनी केला सत्कार.. भिवंडी एसटी स्थानक  ते  नागांव रस्त्याचे काम ऊत्तम झाल्याने महापालिका आयुक्तांचा  काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनंता पाटील यांनी केला सत्कार.. Reviewed by News1 Marathi on March 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads