Header AD

कोविडच्या लढ्यात सगळयांनी सहकार्य करावे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोविडचा लढा पुनश्च चालू झाला आहेतरी या लढयात सगळयांनी सहकार्य करावेअसे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आय.एम.ए.निमाकेम्पा आणि होमिओपॅथिक असोसिएशन या संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर आज संपन्न झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.


 १३ मार्च २०२० रोजी कोविड उपाययोजनांबाबत प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती. गेले काही दिवसांपासून कोविडची रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत रुपरेषा ठरविण्यासाठी आज या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत कोविड साथीच्या वाढणा-या संख्येबाबत सखोल चर्चा करण्यात येवून शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे रुग्णालयांना गाईडलाईन ठरवून देण्याचे सांगण्यात आले. कोविड टेस्टिंग वाढविण्यासाठी चाचणी केंद्रे वाढविणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित फिजीशियन यांनी व्यक्त केल्यावर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सहमती दर्शविली.


कोविड रूग्णांचे निदान त्वरीत होण्यासाठी तापाचे दवाखाने पुन्हा पूर्ण कार्यक्षमतेने सुरु करणेबाबतच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोविडची लक्षणे असलेला रुग्ण गंभिर आजारी झाल्यास आणि सदर रुग्णाची कोविड टेस्ट केलेली नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डॉक्टरवर फौजदारी कारवाई केली जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे एखादया रुग्णाच्या सिटी स्कॅनमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास परंतू सदर रुग्णास त्रास होत नसेल तरीही त्यास संशयित रुग्ण म्हणून सावळाराम कोविड सेंटरमध्ये दाखल करावे अशा सुचना त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिल्या.


या बैठकीस अतिरिक्त आयुक्त,कडोंमपा सुनिल पवारपोलिस उपआयुक्त विवेक पानसरेसहा. आयुक्त अनिल पोवारमहापालिका वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटीलरुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैदयकीय अधिकारी पुरुषोत्तम टिकेशास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाचे मुख्य वैदयकीय अधिकारी सुहासिनी बडेकर साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटीलडॉ. सरवणकर‍ उपस्थित होते.


कोविडच्या लढ्यात सगळयांनी सहकार्य करावे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी कोविडच्या लढ्यात सगळयांनी सहकार्य करावे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी Reviewed by News1 Marathi on March 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads