Header AD

रिव्‍हर्स टोटल शोल्‍डर रिस्‍पलेसमेंट सर्जरीने ७० वर्षीय वृद्ध महिलेला दिली उत्तम जीवनाची खात्री
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ७० वर्षीय वृद्ध महिलेवर रिव्‍हर्स टोटल शोल्‍डर रिस्‍पलेसमेंट सर्जरी करून कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनी ७० वर्षीय वृद्ध महिलेला उत्तम जीवनाची खात्री दिली आहे.


विस्‍थापित खांद्याने पीडित असलेल्या या वृद्ध महिला रुग्णाने स्‍थानिक बोनसेटरकडून उपचार घेतला होता. पण योग्य उपचार न मिळाल्‍यामुळे तिच्‍या खांद्याची स्थिती मागील ६ महिन्‍यांमध्‍ये अत्‍यंत बिकट झाली. कल्‍याण येथील फोर्टिस हॉस्पि‍टलमधील जॉइण्‍ट रिप्‍लेसमेंटचे सल्‍लागार आणि स्‍पाइन सर्जन डॉ. राघवेंद्र केएस यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत तज्ञांच्‍या टीमने ही शस्‍त्रक्रिया केली आहे आणि तिला वेदना व तणावामधून बरे केले आहे. ही शोल्‍डर रिप्‍लेसमेंट शस्‍त्रक्रिया पारंपारिक शोल्‍डर रिप्‍लेसमेंट सर्जरी कमी परिणामकारक आणि अयशस्‍वी  ठरण्‍याची उच्‍च शक्‍यता असताना केली जाते.


निवृत्त सेना अधिकारी असलेले संतोष महाडिक हे ड्युटीवर असताना त्यांच्या आईचा खांदा अनेक वेळा विस्‍थापित झाला होता. याबाबत काहीच माहित नसल्‍यामुळे त्यांच्या आईने तिच्‍या खांद्याच्‍या उपचारासाठी स्‍थानिक बोनसेटरला भेट दिली. यामुळे तिला काही काळासाठी बरे वाटलेपण खांदा विस्‍थापित होणे वारंवार होऊ लागले. गेल्‍या वर्षी महाडिक निवृत्त झाले आणि लॉकडाऊन होण्‍यापूर्वी घरी परतले तेव्‍हा आपल्या आईचा खांदा योग्‍य स्थितीत नसल्याचे निदर्शनास आले.


याबाबत त्यांनी ऑर्थोपेडिक डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत केलीत्यांनी सर्जरी करण्‍याचा सल्‍ला दिला. यानंतर त्यांच्यावर फोर्टिस येथे रिव्‍हर्स टोटल शोल्‍डर रिस्‍पलेसमेंट सर्जरी करण्यात आली. या शस्‍त्रक्रियेमुळे त्या आता काहीशा निश्चिंत झाल्या असल्याचे त्यांचा मुलगा संतोष महाडिक यांनी सांगितले.


रूग्‍णाला फोर्टिस हॉस्पिटलमध्‍ये आणण्‍यात आले तेव्‍हा तिला ६ महिन्‍यांहून अधिक काळापासून वेदना व त्रास होत होता. ती दुर्लक्षित करण्‍यात आलेल्‍या राइट अॅण्‍टेरिअर शोल्‍डर डिस्‍लोकेशनने पीडित होती आणि तिच्‍या खांद्याची हालचाल ९० टक्‍क्‍यांहून अधिक थांबली होती. एमआरआय केल्‍यानंतर अॅण्‍टेरिअर डिस्‍लोकेटेड शोल्‍डरसह बँकार्टस् लेसनजवळपास २० मिमी हिलसॅच लेसनसंपूर्ण रोटेटर कफ टीअरग्‍लेनो-ह्युमरल आर्थिरिटीस आणि जॉइण्‍ट एफ्यूजन असल्‍याचे निदान झाले. संपूर्ण फिटनेसचे मूल्‍यांकन केल्‍यानंतर रूग्‍णावर सर्जरी करण्‍यात आली असल्याची माहिती डॉ. राघवेंद्र केएस यांनी दिली.  

रिव्‍हर्स टोटल शोल्‍डर रिस्‍पलेसमेंट सर्जरीने ७० वर्षीय वृद्ध महिलेला दिली उत्तम जीवनाची खात्री रिव्‍हर्स टोटल शोल्‍डर रिस्‍पलेसमेंट सर्जरीने ७० वर्षीय वृद्ध महिलेला दिली उत्तम जीवनाची खात्री Reviewed by News1 Marathi on March 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads