Header AD

होळी निमित्त ट्रेलचे ‘कलर्स ऑफट्रेल’ कॅम्पेनमुंबई, २५ मार्च २०२१ : रंगांची उधळण करणारा होळी हा सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमीसारखा साजरा करता येत नाही. हा सण सर्वांसोबत वेगळ्याप्रकारे साजरा करता यावा या उद्देशाने ट्रेलने ‘कलर्सऑफट्रेल’ कॅम्पेनची घोषणा केली आहे. याद्वारे धमाल मस्ती आणि मजेशीर व्हिडिओद्वारे यूझर्सचे सतत मनोरंजन केले जाईल. चार दिवसांच्या या दीर्घ कँपेनमध्ये ट्रेलवर मॅकडॉन, अय्यंगार अँड सन्स, संचित बत्रा, अनुषा स्वामी, वैभव केस्वानी, नंदू रामी सेट्‌टी आणि रोहिल जेठमलानी या आघाडीच्या क्रिएटर्सद्वारे तयार केलेले व्हिडिओ व टिप्स असतील. 


क्रिएटर्स व्हिडिओ व टिप्सच्या स्वरुपात त्यांची निर्मिती शेअर करतील व लोकांना सध्याच्या महामारीच्या काळातही आनंदी व सुरक्षित राहून होळी साजरी करण्याचे आवाहन करतील. प्रसिद्ध क्रिएटर्स ट्रेलवर परफेक्ट लूकसाठी मेकअप ट्युटोरिअल्स, होली ग्रुप व्हिडिओ चॅट, होळीच्या दिवशी तुमच्या क्लासिक पांढऱ्या कुर्त्याची स्टाइल कशी करायची, तसेच आपल्या त्वचेला इजा पोहोचू नये म्हणून नैसर्गिक रंग कसे तयार करता येतील, संपूर्ण कुटुंबाला रंगांमध्ये सहभागी करून घेण्यासंबंधी, भांगविषयीच्या दंतकथा मोडीत काढत, दिल्लीतील प्रसिद्ध गुजियाचे मूल्यांकन करत, सोपे होली डेझर्ट यासह आपण यंदा सुरक्षित होळी कशी खेळू शकतो, याचे स्केच व्हिडिओ या कँपेनमध्ये असतील.


या मंचावर विविध समाज, राज्य, संस्कृतीतील रंगीबेरंगी क्रिएटर्सचा सहभाग असेल. एकजुटीने हे सर्जनाची शक्ती दाखवून देतील व सुरक्षित तसेच आनंदी होळीसाठी यूझर्सना प्रोत्साहन देतील.

होळी निमित्त ट्रेलचे ‘कलर्स ऑफट्रेल’ कॅम्पेन होळी निमित्त ट्रेलचे ‘कलर्स ऑफट्रेल’ कॅम्पेन Reviewed by News1 Marathi on March 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads