Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरूच

 

■कोरोना रुग्णांनी ओलांडला ७२ हजारांचा टप्पा

सर्वा धिक ८८१ नवीन रुग्ण तर २ मृत्यू ....



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून  कोरोना रुग्णांनी ७२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज सर्वाधीक तब्बल ८८१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ४०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन मृत्यू झाले आहे.


 

      आजच्या या ८८१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७२,८२१ झाली आहे. यामध्ये ५९२९ रुग्ण उपचार घेत असून ६५,६९० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८८१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१४९कल्याण प – ७१डोंबिवली पूर्व २६३डोंबिवली प – १४४मांडा टिटवाळा – ३८ मोहना – १५, तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरूच कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरूच  Reviewed by News1 Marathi on March 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads