Header AD

भिवंडीत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उदघाटन

  भिवंडी :दि.१ ( प्रतिनिधी ) युवकांना राज्य व केंद्रीय सेवेत निवड होण्यासाठी भिवंडी शहरात प्रथमच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्यात आली असून त्याचे उदघाटन नुकताच सह्याद्री पतसंसंस्थेचे माजी अध्यक्ष डी के म्हात्रे ,माँ साहेब पतसंस्थेचे संस्थापक मदन पाटील ,आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे अध्यक्ष अँड भारद्वाज चौधरी ,साठे महाविद्यालयातील संस्कृत विषयाचे प्राध्यापक राहुल सदगीर व संस्थेचे अध्यक्ष संतोष साळवी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले .


         भिवंडी सारख्या कामगार वस्तीच्या शहरात अनेक युवकांना इच्छा असून ही स्पर्धा परीक्षांची तयारी करण्या साठी मार्गदर्शन व अभ्यासिका नसल्याने ती स्वप्ने पूर्ण होऊ शकत नसल्याने परिवर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करीत असल्याची माहिती परिवर्तन फाऊंडेशन चे संस्थापक संतोष साळवी यांनी प्रास्ताविकात देत या अभ्यासिकेत एम पी एस सी यु पी एस सी सह इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके व अभ्यास करण्यासाठीची शांत जागा उपलब्ध होणार असून तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन भिवंडी शहरातील परीक्षार्थींना उपलब्ध करून देण्याने भविष्यात राज्य व केंद्र सरकारच्या स्परध परिक्षे मध्ये भिवंडी शहरातील युवक सुध्दा चमकत असा विश्वास व्यक्त केला .
           तर अँड भारद्वाज चौधरी यांनी या अभ्यासिकेच्या संकल्पनेचे कौतुक करीत या अभ्यासिकेतून उज्वल भविष्याची स्वप्न भिवंडी शहरातील युवा पिढी पाहू शकणार असल्याचे प्रतिपादन केले .तर या कार्यक्रमाचे औचित्य साधीत परिवर्तन फाऊंडेशन च्या माध्यमातून तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा दिनी आयोजित केलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी राजे यांनी केले तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवक विद्यार्थी उपस्थित होते .
भिवंडीत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उदघाटन भिवंडीत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उदघाटन Reviewed by News1 Marathi on March 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads