Header AD

भिवंडीत कारवाई करीत जप्त केलेली तब्बल २०४ वाहने वाहन मालकांनी घेऊन जाण्याचे वाहतूक शाखेचे आवाहनभिवंडी : दि.१८  (प्रतिनिधी  ) भिवंडी शहर वाहतुक विभाग वतीने सन २०१६ ते २०२० या कालावधीत केलेल्या विशेष कारवाई दरम्यान एकूण १४४ रिक्षा व ६० मोटार  सायकल अशी वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यापैकी २५  मोटार सायकल व ५३ रिक्षा या बेवारस असून ३५ मोटार सायकल व ९१ रिक्षांवर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे .


           वरील सर्व वाहने ही भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतील कारीवली गाव येथील शासकीय जागेत सुरक्षित ठेवण्यात आली होती. परंतु वाहने पावसात भिजुन कुजुन खराब झाली असुन त्यातुन दुर्गधी येत असल्याने त्या बाबत परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी तक्रारी केलेल्या आहेत. नमुद वाहनांचा लिलाव करून त्यांची विल्हेवाट करणे बाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी आदेश झाले आहेत. या वाहनांपैकी वाहतुक उप विभाग भिवंडी येथे उपलब्ध असलेल्या वाहनापैकी १२९ रिक्षांचे मालक व ४१ मोटार सायकलच्या मालकांची माहीती आर.टी.ओ. ठाणे यांचेकडे पत्र व्यवहार करून फॉर्म कमांक २२४ नुसार माहीती प्राप्त करण्यात आली आहे या वाहन मालकांच्या निवास स्थानाचे पत्ते शोधून त्या ठिकाणावर वाहन मालकांना नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत .


          भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे की, वरील जप्त व बेवारस रिक्षा व मोटार सायकल हया आपल्या मालकीच्या असल्यास, त्यांची चोरी झाली असल्यास, अगर त्या हरविल्या असल्यास वाहनांच्या मालकी हक्काची आवश्यक ती कागदपत्र घेवुन वाहतुक उप विभाग भिवंडी या कार्यालयात समक्ष येवुन संपर्क साधावा. अन्यथा वरील जप्त व बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोणीही पुढे आले नाही तर वरील सर्व जप्त व बेवारस वाहनांचा शासकीय लिलाव करण्यात येईल अशी माहिती राजेंद्र मायने यांनी दिली आहे .
भिवंडीत कारवाई करीत जप्त केलेली तब्बल २०४ वाहने वाहन मालकांनी घेऊन जाण्याचे वाहतूक शाखेचे आवाहन भिवंडीत कारवाई करीत जप्त केलेली तब्बल २०४ वाहने वाहन मालकांनी घेऊन जाण्याचे वाहतूक शाखेचे आवाहन Reviewed by News1 Marathi on March 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला मनसेचा ठाम विरोध

  डोंबिवली ( शंकर जाधव ) ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याच्या सरकारच्या नियमाला मनसेने ठाम विरोध केला आहे.करोनाची  तिसरी लाट येणार नाही हे स...

Post AD

home ads