Header AD

कोरोना योद्ध्यांना साह्य, याच आपणा साठी शुभेच्छा! वाढदिवस साजरा न करण्याचा नानासाहेब इंदिसेंचा निर्णय




ठाणे (प्रतिनिधी) - सद्या कोरोनाचा काळ आहे. या काळात सोेशल डिस्टन्सींग राखणे अत्यंत गरजेचे आहे. या काळात गर्दी करणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे आपल्या वाढदिवसाला कोणीही आपणाला भेटायला येऊ नये; त्याऐवजी कोरोना योद्ध्यांना साह्य करण्याची भूमिका स्वीकारावी, असे आवाहन रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी केले आहे. येत्या 5 मार्च रोजी नानासाहेब इंदिसे यांचा वाढदिवस आहे. त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दरवर्षी वाढदिवसाच्या अनुषंगाने हजारो लोक आपणाला भेटायला येत असतात. मात्र, सध्याचा कोरोनाचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे. कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सबंध राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागलेले आहेत. अशा स्थितीत गर्दी करु नये, सामाजिक अंतर राखावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाचा आपण सर्वांनी सन्मान केला पाहिजे. त्यामुळे आपण वाढदिवसाच्या अनुषंगाने कोणालाही भेटणार नाही. ज्यांना मला शुभेच्छा द्यावयाच्या असतील त्यांनी कोरोना योद्ध्यांना सहकार्य करावे; वैद्यकीय अधिकारी किंवा गोरगरीबांना औषधोपचार करावा, असे आवाहन नानासाहेब इंदिसे यांनी केले आहे.

कोरोना योद्ध्यांना साह्य, याच आपणा साठी शुभेच्छा! वाढदिवस साजरा न करण्याचा नानासाहेब इंदिसेंचा निर्णय कोरोना योद्ध्यांना साह्य, याच आपणा साठी शुभेच्छा! वाढदिवस साजरा न करण्याचा नानासाहेब इंदिसेंचा निर्णय Reviewed by News1 Marathi on March 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads