Header AD

वाल्‍वो लाइन तर्फे पहिली अॅन्‍युअल मेकॅनिक्‍स मंथ मोहिम सादर


■जागतिक ब्रॅण्‍ड कोविड-१९चा प्रार्दुभाव असताना देखील कार्य सुरू ठेवलेल्‍या उद्योग क्षेत्रातील आवश्‍यक गटातील व्‍यावसायिकांना प्रशंसित करणार ...


मुंबई - १ मार्च २०२१– वाल्‍वोलाइन कमिन्‍स प्रा. लि. या प्रिमिअम ब्रॅण्‍डेड ल्‍युब्रिकण्‍ट्स, तसेच ऑटोमोटिव्‍ह सर्विसेसच्‍या आघाडीच्‍या प्रदाता कंपनीने त्‍यांची पहिली अॅन्‍युअल मेकॅनिक्‍स मंथ कॅम्‍पेन सादर केली. 


ही मोहिम संपूर्ण मार्च महिना राबवण्‍यात येणार असून यादरम्‍यान १५० वर्षांचा वारसा असलेला इंजिन ऑईल ब्रॅण्‍ड कार्यरत असलेल्‍या विविध देशांमधील मेकॅनिक्‍सना सन्‍मानित करण्‍यात येईल. जागतिक स्‍तरावर वाल्‍वोलाइनने मार्च २०२० मध्‍ये त्‍यांची पहिली वाल्‍वोलाइन मेकॅनिक्‍स मंथ मोहिम सादर केली होती. यंदा ब्रॅण्‍ड कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भाव असताना देखील दररोज सेवा देणा-या मेकॅनिक्‍सचे विशेष आभार मानण्‍यासाठी भारतामध्‍ये देखील मोहिम विस्‍तारित करण्‍यास सज्‍ज आहे. 


''कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भाव असताना देखील भारतभरातील सर्विस सेंटर्स व ऑटो-रिपेअर शॉप्‍स आपल्‍याला सर्वोत्तम सेवा देताना कधीच थांबले नाहीत,'' असे वाल्‍वोलाइन कमिन्‍स इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक संदीप कलिया म्‍हणाले. ''मागील वर्षामध्‍ये त्‍यांनी दाखवलेल्‍या धैर्यामुळे या अनसंग हिरोजना प्रकाशझोतात आणणे आवश्‍यक आहे. त्‍यांचे प्रयत्न व समर्पिततेने आपल्‍याला कार्यरत राहण्‍यास मदत केली, सर्व आवश्‍यक सेवा महामारीदरम्‍यान देखील गरजूंपर्यंत पोहाचू शकल्‍या. आम्‍ही आमच्‍या सर्व मेकॅनिक सहका-यांचे मनापासून आभार मानतो.''


या मोहिमेच्‍या माध्‍यमातून वाल्‍वोलाइन सोशल मीडिया, ऑन-ग्राऊण्‍ड कार्यक्रम, विशेष सहभाग कार्यक्रम आणि मेकॅनिक्‍ससाठी स्‍पर्धांद्वारे मेकॅनिक्‍स व उद्योगक्षेत्रातील व्‍यावसायिकांच्‍या उत्‍साहाला प्रशंसित करेल. मोहिमेदरम्‍यान ब्रॅण्‍डचा विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून देशातील जवळपास ५०,००० मेकॅनिक्‍सपर्यंत पोहोचण्‍याचा आणि त्‍यांच्‍याशी संलग्‍न होण्‍याचा मनसुबा आहे. वाल्‍वोलाइनने नेहमीच त्‍यांच्‍या सर्व भागीदारांशी संलग्‍न असण्‍याची खात्री घेतली आहे आणि मेकॅनिक्‍स त्‍या साखळीचा लक्षणीय भाग आहेत. ही मोहिम त्‍यांचा उत्‍साह व धैर्याला, तसेच इतिहासामधील अनपेक्षित काळादरम्‍यान देखील त्‍यांनी सुरू ठेवलेल्‍या सेवांना प्रशंसित करण्‍याशी समर्पित आहे.


आवश्‍यकतेनुसार मेकॅनिक्‍सना कोविड-१९ चा सामना करण्‍यासाठी त्‍यांच्‍या सामान्‍य नित्‍यक्रमामध्‍ये बदल करावा लागला. कामकाजाच्‍या वेळेमध्‍ये बदल झाला आहे, वाहनांच्‍या आत अतिरिक्‍त स्‍वच्‍छता उपायांची अंमलबजावणी करण्‍यात आली आहे आणि कार्यरत ठिकाणी मानवी संपर्क मोठ्या प्रमाणात कमी करण्‍यात आला आहे. ठिकाण कोणतेही असो, अनेक दुकानांना ड्रॉप-ऑफ व पिक-अप सेवा देण्‍यात आल्‍या आहेत. 


संदीप पुढे म्‍हणाले, ''आमचा ब्रॅण्‍ड इतिहास विविध उपक्रमांसह मेकॅनिक्‍सना साह्य करण्‍याशी समर्पित राहिला आहे. कोविड-१९ प्रार्दुभावामुळे अनेक बदल, अथक मेहनत, सुरक्षितताविषयक उपाय आणि त्‍यांना त्‍यांच्‍या व्‍यवसायामध्‍ये कराव्‍या लागलेल्‍या परिवर्तनांमुळे आमची त्‍यांना साह्य व पाठिंबा दाखवण्‍यासाठी आणि जगभरातील इतरांना अशा प्रकारचे कार्य करण्‍यास प्रेरित करण्‍यासाठी आमचे प्रयत्‍न वाढवण्‍याची इच्‍छा आहे.'' 

 

वाल्‍वो लाइन तर्फे पहिली अॅन्‍युअल मेकॅनिक्‍स मंथ मोहिम सादर वाल्‍वो लाइन तर्फे पहिली अॅन्‍युअल मेकॅनिक्‍स मंथ मोहिम सादर Reviewed by News1 Marathi on March 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads