Header AD

ठाण्यात महिलांना सायबर साक्षरतेचे धडे जागतिक महिला दिना निमित्त टीजेएसबी व सायबर सेलचा संयुक्त उपक्रमठाणे,ता 7 प्रतिनिधी :-  इंटरनेटचा जितका वापर होतो तितकाच गैरवापरदेखील केला जातो.तेव्हा,कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता महिलावर्गाने स्वतःसह आपल्या कुटुंबालाही सायबर साक्षर करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन टीजेएसबी बँकेचे मुख्य माहिती व सुरक्षा अधिकारी समीर गडवे यांनी केले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन टीजेएसबी व ठाणे पोलिसांच्या सायबर सेल यांच्यावतीने महिलांसाठी आयोजीत केलेल्या सायबर साक्षरता या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.


               ठाणे जनता सहकारी बँकेच्या राममारूती रोड शाखेत अबोली रिक्षाचालक महिला तसेच, शिक्षक-शिक्षकेतर महिलांच्या उपस्थितीत नुकताच हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी,नगरसेविका नंदिनी विचारे,नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी,टीजेएसबीच्या डिजीटल बँकिंगचे जनरल मॅनेजर स्वप्नील जांभळे,सायबर सेलच्या अधिकारी स्नेहल अडसुळे,गंगाधर तिर्थकर, सुचित तायडे आणि टीजेएसबीचे शाखाव्यवस्थापक अरूण देसाई आदी उपस्थित होते. 


             कार्यक्रमाचे सुत्रसंचालन टीजेएसबी च्या स्नेहा पित्रे यांनी केले. यावेळी गडवे यांनी उपस्थित महिलांना सध्याच्या सायबर युगात प्रत्येकाने कसे दक्ष राहणे गरजेचे आहे.किंबहुना,मोबाईलद्वारे व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.तर, उपनिरिक्षक स्नेहल अडसुळे यांनी,इंटरनेटमुळे कामे सुलभ होत असली तरी,महिलांनी कोणत्याही आर्थिक आमिषाला,फसव्या जाहिरातीना बळी पडु नये.अशी सुचना करतानाच सोशल साईटसवर माहिती शेअर करताना सावधागिरी बाळगावी.असे मत व्यक्त केले.


              सायबर सेलच्या तिर्थकर व तायडे यांनीही उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संयोजक शाखाधिकारी अरूण देसाई यांनी, मोबाईल व इंटरनेटमुळे जगभरात बऱ्याच घडामोडी होत असल्याचे सांगून भविष्यात युद्धदेखील मोबाईलवरूच होईल.अशी भिती वर्तवुन आपला कोणताही पासवर्ड किंवा सांकेतिक क्रमांक शेअर न करण्याचे आवाहन केले.

ठाण्यात महिलांना सायबर साक्षरतेचे धडे जागतिक महिला दिना निमित्त टीजेएसबी व सायबर सेलचा संयुक्त उपक्रम ठाण्यात महिलांना सायबर साक्षरतेचे धडे जागतिक महिला दिना निमित्त टीजेएसबी व सायबर सेलचा संयुक्त उपक्रम Reviewed by News1 Marathi on March 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads