Header AD

भिवंडीत देहविक्री करणाऱ्या महिलांच्या बचतगटाने सुरू केली घरघंटी चक्की
भिवंडी दि. २५(प्रतिनिधी  ) भिवंडी शहरातील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या हनुमान टेकडी येथील वस्तीत राहणाऱ्या महिलांच्या आर्थिक ,सामाजिक आरोग्य विषयक जनजागृती करणाऱ्या श्री साई सेवा संस्था या सामाजिक संस्थेच्या प्रमुख डॉ स्वाती खान यांनी येथील महिलांना या व्यवसायातुन बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच येथील महिलांच्या स्थापन केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून घरघंटी चक्की सुरू करण्यात आली आहे .


          डॉ स्वाती खान यांनी येथील महिलांना संघटित करून परिवर्तन स्वयं सहाय्यता महिला बचतगट महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरीक उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन केले आहे.या महिला बचत गटास श्री साई सेवा संस्था यांनी एम ई एस एच फाऊंडेशन च्या अर्थ साहाय्याने ही भेट बचतगटास दिली असून तिचा गुरुवारी शुभारंभ डॉ स्वाती खान यांच्या शुभहस्ते करण्यात आला .या उपक्रमामुळे महिलांना स्वयं रोजगाराचे साधन उपलब्ध होणार असल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला आहे .
भिवंडीत देहविक्री करणाऱ्या महिलांच्या बचतगटाने सुरू केली घरघंटी चक्की भिवंडीत देहविक्री करणाऱ्या महिलांच्या बचतगटाने सुरू केली घरघंटी चक्की Reviewed by News1 Marathi on March 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads