Header AD

कल्याण रेल्वे स्‍थानक परिसरातील वाहतूकीची कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने रिक्षा व फेरीवाल्यांचे नियोजन करणार महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एसकेडिसीएल मार्फत सॅटिस प्रकल्पांतर्गत विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी वाहतूकीची प्रचंड कोंडी होणा-या कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात तात्पुरत्या स्वरुपात पार्कींग व्यवस्थेचे तसेच फेरीवाले व स्टेशन परिसरातील असंख्य रिक्षा यांचे नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून आज महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवाररेल्वेचे एरिया मॅनेजर डॉ. प्रमोद जाधवउप आयुक्त पल्लवी भागवत,कार्यकारी अभियंता तरूण जूनेजासुभाष पाटीलपरिवहन व्यवस्थापक मिलींद धाटवरिष्ठ वाहतूक निरिक्षक सुखदेव पाटीलआरटीओ चे प्रतिनिधी यांनी रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली.


रेल्वे स्थानका नजिकचे तहसिलदार कार्यालयम. फुले पोलिस स्टेशनब्रेकमन चाळवालधुनी ब्रीज जवळची रेल्वेची जागा या सर्व परिसराची त्यांनी पाहणी केली. पोलिसांची असंख्य वाहने कल्याण येथे रोज येत असून सदर वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था पोलिस लाईन येथे करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांचे वाहनांचे नियोजन वालधुनी ब्रिज नजीकच्या रेल्वेच्या जागेत तसेच ब्रेकमन चाळ तोडून तेथे इतर भागांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पार्कींगची सोय केल्यास वाहतूकीची कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.


 त्याचप्रमाणे तहसिल कार्यालयाचे स्थलांतर योग्य जागेत करुन त्या जागेत पार्कींग व्यवस्था करणे सुलभ होवू शकेलस्टेशन परिसरातील बसेसचेरिक्क्षांचे व फेरीवाल्यांचे नियोजन करण्यासाठी जागेची पाहणी करणेकामी सदर पाहणी दौरा आयोजित केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी यावेळी दिली.

कल्याण रेल्वे स्‍थानक परिसरातील वाहतूकीची कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने रिक्षा व फेरीवाल्यांचे नियोजन करणार महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार कल्याण रेल्वे स्‍थानक परिसरातील वाहतूकीची कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने रिक्षा व फेरीवाल्यांचे नियोजन करणार  महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार Reviewed by News1 Marathi on March 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads