Header AD

कर्तुत्ववान महिलांचा हिरकणी गौरव पुरस्काराने सन्मान आरएसपी अधिकारी युनिटचा उपक्रम

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  जागतिक महिला दिनानिमित्त आरएसपी अधिकारी युनिटच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली परिसरातील कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला सावित्रीच्या लेकींच्या हिरकणी गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शनिवारी कल्याण पश्चिमेतील स्वामी नारायण हॉल याठिकाणी हा सोहळा पार पडला.


याप्रसंगी पीएसआय मंजूषा शेलार यांनी आरएसपी अधिकाऱ्यांनी देखील कोरोना काळात पोलीस प्रशासनालाच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला मदत केली आहे. आरएसपी युनिटचे कार्य खूप उल्लेखनीय आहे या शब्दात गौरव केला. हिरकणी गौरव पुरस्कारासाठी पोलीस विभागवाहतूक विभाग,आरोग्य विभागशिक्षण विभागपरिवहन विभागसफाई कामगारखेळाडूसमाजसेविकानगरसेविकाबँक महिला अधिकारीकलाकारपत्रकार अशा प्रत्येक विभागातील कर्तृत्ववान ५६ महिलांना हिरकणी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सन्मानचिन्ह, सन्मान पत्र,  भेटवस्तू, साडी देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे व सत्कारार्थी हिरकणी यांचे कमांडर मणिलाल शिंपी यांनी आभार मानले.

कर्तुत्ववान महिलांचा हिरकणी गौरव पुरस्काराने सन्मान आरएसपी अधिकारी युनिटचा उपक्रम कर्तुत्ववान महिलांचा हिरकणी गौरव पुरस्काराने सन्मान आरएसपी अधिकारी युनिटचा उपक्रम Reviewed by News1 Marathi on March 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ब्रिजस्टोन इंडिया आणि इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट यांची भागीदारी, टोकियो गेम्स मध्ये चार भारतीय खेळाडूंच्या विजयासाठी प्रयत्नशील

■सध्या आयआयएस येथे  32  क्रीडापटू एथलेटीक्स सेंटर ऑफ एक्सलेन्सचा भाग आहेत ,  त्यांना नामांकीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून पूर्ण शिष्यवृत्त...

Post AD

home ads