Header AD

बँक कर्मचाऱ्यांना कोरोना विरोधी लसीकरण मोहीमेत प्राधान्य द्यावे खा.डॉ. श्रीकांत शिंदेची मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव )  कोरोना काळात सुरुवाती पासूनच डॉक्टर्सवैद्यकीय आणि आरोग्य कर्मचारीपोलिस यंत्रणासफाई कामगार यांच्याबरोबरच  बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणारे बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा फ्रंटलाईन वर्कर्स श्रेणीत समावेश करत कोरोना विरोधी लसीकरण मोहीमेत प्राधान्य द्यावेअशी मागणी लोकसभा अधिवेशनादरम्यान शुन्य प्रहर काळात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली.

      देशामध्ये  १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँक२२ खाजगी बँक४४ विदेशी बँक५६ प्रादेशिक ग्रामीण बँक१४८५ नागरी सहकारी बँक तर ९६००० ग्रामीण सहकारी बँका असून यात १५ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला होता. 


       रेल्वे तसेच बस सेवांवर प्रतिबंध असताना देखील कामावर हजर राहून तेव्हा अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याचे काम तसेच विविध योजनां कार्यान्वित ठेवण्याचे काम या बँक  कर्मचारी करत असताना काही कर्मचारी कोरोना बाधित झाले तर काहिंचा कोरोनामुळे मृत्यू झाला.या पार्श्वभूमीवर सर्व बँक कर्मचाऱ्यांना फ्रँटलाईन वर्कर्स श्रेणीत घेऊन त्यांना देखील कोरोना लसीकरण मोहिमेत प्राधान्य देऊन त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करता येतीलअसे मत यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी व्यक्त केले.

बँक कर्मचाऱ्यांना कोरोना विरोधी लसीकरण मोहीमेत प्राधान्य द्यावे खा.डॉ. श्रीकांत शिंदेची मागणी बँक कर्मचाऱ्यांना कोरोना विरोधी लसीकरण मोहीमेत प्राधान्य द्यावे खा.डॉ. श्रीकांत शिंदेची मागणी Reviewed by News1 Marathi on March 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महानगरपालिका उभारणार प्राणवायू प्रकल्प २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प ३० एप्रिल पर्यंत होणार कार्यान्वित

ठाणे , प्रतिनिधी ;  प्राणवायूचा होणारा मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू निर्मा...

Post AD

home ads