Header AD

काजूवाडी लसीकरण केंद्रात सभागृह नेते अशोक वैती यांनी घेतली लस

  ठाणे  , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जेष्ठ नागरिक आणि महिलांना गर्दीचा त्रास सहन करण्याची परिस्थिती ओढवेल यामुळेच शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक आणि सभागृहनेते अशोक वैती यांनी पाठ पुरावा करून काजूवाडीतील जेष्ठ नागरिक आणि महिलांना सुविधा आणि सहजपणे लस मिळावी या साठी पालिका शाळा क्र-१३०-१३१ मध्ये लसीकरणाच्या केंद्र मंजुरी मिळवली. या केंद्रावर अत्यंत सहजपणे विना गर्दी लोकांना लसीकरण करून घेणे शक्य होत आहे. याच लसीकरण केंद्रात प्रथम जेष्ठ नागरिकांची व्यवस्था केल्यानंतर चार दिवसांनी नोंदणी करून सभागृहनेते अशोक वैती यांनी लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करून घेतले. 


         आरोग्य केंद्रावर जेष्ठ नागरिक आणि महिलांना लसीकरण सहजतेने उपलब्ध होत आहे का याबाबत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. लसीकरण केंद्रात आलेल्या नागरिकांसाठी बसण्याच्या आसनाची  व्यवस्था करण्यात  आली आहे बाहेरून आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील सभागृह नेते अशोक वैती यांनी केली.

काजूवाडी लसीकरण केंद्रात सभागृह नेते अशोक वैती यांनी घेतली लस काजूवाडी लसीकरण केंद्रात सभागृह नेते अशोक वैती यांनी घेतली लस Reviewed by News1 Marathi on March 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मेटल आणि बँकिंग स्टॉक्स मध्ये घसरण

  मुंबई, २० सप्टेंबर २०२१ :  आज ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शव...

Post AD

home ads