Header AD

स्वच्छ डोंबिवली – सुंदर डोंबिवली` कागदावरच रस्त्यावरील कचरा उचलला जात नसल्याने नागरीक संतप्त

 डोंबिवली ( शंकर जाधव ) राहण्यासाठी योग्य असल्याने डोंबिवलीचा १२ व पालिकेचा १४ वा नंबर आल्याने आपली पाठ थोपवून घेणाऱ्या केडीएमसीत रस्त्यावरील कचरा उचलण्यास वेळ अथवा तशी मानसिकता नसावी हे दिसून आले.त्यामुळे शहरभर`स्वच्छ डोंबिवली – सुंदर डोंबिवली`अशी बॅनरबाजी करणाऱ्या प्रशासनाला प्रत्यक्ष काम करण्यास रस आहे का असा प्रश्न डोंबिवलीकरांकडून विचारला जात आहे. स्वच्छ डोंबिवली – सुंदर डोंबिवली कागदावरच दिसत असल्याने रस्त्यावरील कचरा उचलला जात नसल्याने नागरीक संतप्त झाले आहे.राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हा सचिव प्रसन्न अचलकर यांनी यासंदर्भातील लेखी तक्रार केली आहे.रस्त्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. तर कचरा टाकणाऱ्यांवर जसे कारवाईचे नियम लादले जातात तसे नियम कचरा न उचलणाऱ्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे का असा प्रश्न राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हा सचिव प्रसन्न अचलकर यांनी उपस्थित केला आहे.डोंबिवली पश्चिमेकडीलजयहिंद कॉलिनी येथील गावदेवी सोसायटीजवळील झिपरू सदनलगत रस्त्याच्या कडेला गेली आठ दिवस कचरा उचलला गेला नाही.त्यामुळे आजूबाजूच्या इमारतीत दुर्गंधी पसरली आहे. भटकी कुत्री सदर ठिकाणी कचऱ्यावर येत असल्याने रहिवाश्यांना कुत्रा चावेल अशी भीती वाटत आहे.यासंदर्भात अचलकर यांनी सदर ठिकाणचे फोटो आणि निवेदन पालिका आयुक्त डॉ, विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.तर घनकचरा व्यवस्थापक उपायुक्त रामदास कोकरे यांनाहि निवेदन दिले आहे.ठिकठिकाणी आपल्या `स्वच्छ डोंबिवली – सुंदर डोंबिवली` बॅनरबाजी करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या या प्रशासनाला आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर काम करण्याची सवय कधी लावणार लावणार असा प्रश्न नागरिककांकडून विचारला जात आहे.

स्वच्छ डोंबिवली – सुंदर डोंबिवली` कागदावरच रस्त्यावरील कचरा उचलला जात नसल्याने नागरीक संतप्त स्वच्छ डोंबिवली – सुंदर डोंबिवली` कागदावरच रस्त्यावरील कचरा उचलला जात नसल्याने नागरीक संतप्त Reviewed by News1 Marathi on March 10, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads