Header AD

एनआरसी काँलनी तील पाड कामा बाबत चौकशी आवाहाला नंतर कारवाई


■कामगारांच्या शिष्ट मंडळास  पालिका आयुक्तांचे आश्वासन ...                          

कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : मगंळवारी एनआरसी कामगारांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त डाँ विजय सूर्यवंशी यांची भेट घेत आदाणीने एनआरसी काँलनीत रिकामे बंगलेरिकाम्या बिल्डिंग पाडकाम हे कोणतीही परवानगी नसताना सुरु केले असुन कामगारांची थकित देणी जो पर्यंत मिळत नाही. तो पर्यंत पाडकाम करू नये अशी भूमिका मांडली. यावर आयुक्तांनी या पाडकामाबाबत चौकशी अहवालानंतर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. एनआरसी कामगारांच्या या शिष्टमंडळात माया कटारिया, भीमराव डोळस, जे. सी. कटारिया, वासुदेव पाटील, रामदास वळसे पाटील आदींचा समावेश होता.


गेल्या १३ वर्षांपासून बंद आसलेल्या एनआरसी कारखान्यातील कामगारांचा आपल्या हक्काच्या देण्यासाठी लढा सुरु असून आता कंपनी प्रशासनाने कंपनीची जागा अदानी समूहाला विकली आहे. मात्र कामगारांना त्यांच्या हक्काची देणी मिळालेली नसल्यामुळे कामगारांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आदाणीने पाडकाम सुरू करून दडपशाही करीत कामगारांस वेठीस धरण्याचा प्रयत्न करू पाहत आहे. तसेच काँलनीतील वुक्षतोड ही कुठल्याही प्रकराची परवानगी न घेता केली गेली आहे. तसेच मनपाच्या मालमत्ता करांचा थकबाकी प्रश्न आदी बाबी आयुक्तच्या निर्दशानास कामगार शिष्टमंडळाने आणुन दिल्या या बाबत आयुक्तनी पाडकाम प्रश्नाबाबत चौकशी अवहाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईचे आश्वासन दिले. 

एनआरसी काँलनी तील पाड कामा बाबत चौकशी आवाहाला नंतर कारवाई एनआरसी काँलनी तील पाड कामा बाबत चौकशी आवाहाला नंतर कारवाई Reviewed by News1 Marathi on March 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads