Header AD

टिटवाळ्यात नवा सांस्कृतिक खजिना लवकरच होणार खुला

                 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : टिटवाळ्यातल्या वस्तु संग्रहालयात अविनाश हरड यांच्या अश्वमेध फाऊंडेशनच्या माध्यमातुन उल्हास नदी खोऱ्यातील पुरातन वस्तुंचा खजिनाच उपलब्ध झालाय. याच वस्तुसंग्रहालयाला पुढे घेऊन जाण्याचं काम अविनाश हरड यांच्या बरोबरीने ख्यातनाम मुर्तीकार प्रशांत गोडांबे यांनी हाती घेतलं आहे. यामध्ये लाईफ लिजंड असणाऱ्यांच्या हातांचे ठसे जतन करण्यात येणार आहेत.


सिंधुदुर्ग किल्यात छत्रपती महाराजांच्या पायाचा ठसा उपलब्ध आहे तर लंडनच्या मादाम तुसाद पासुन लोणावळ्याच्या संग्रहालयात अनेक महान माणसांच्या मेणाचे पुतळे बघायला मिळतात. याच धर्तीवर प्रशांत गोडांबे यांनी लोकोत्तर कार्य करणाऱ्यांचे हातांचे ठसे पुढच्या ५०० वर्षांसाठी जतन करण्याचा प्रयत्न सुरु केलाय. या हाताचे ठसे घेण्याच्या कार्याची सुरवात आंतराष्ट्रीय ख्यातीचे सर्जन असणारेसुमारे दोन लाख डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणारे सर्जनशिल डॅाक्टर पद्मश्री डॅा. तात्याराव लहाने यांच्या हाताचे ठसे घेऊन करण्यात आली. दि. ११ मार्च २०२१ महाशिवरात्रीच्या दिवशी मुंबईतल्या सर जे. जे. इस्पीतळात तात्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले.


 हातावरील अत्यंत बारीक खुणाही या प्रक्रीयेद्वारे जतन केल्या जातात. बायोमेट्रीक सुरक्षा पाळण्यासाठी  बोटांचे ठसे पुसुन टाकून बाकी हाताचा हुबेहुब ठसा मिळवण्याचं कसब प्रशांत गोडांबे यांनी प्राप्त केलंय. लाखो दृष्टीहिनांच्या आयुष्यात देवतुताचा स्पर्श लाभलेल्या तात्यांनी उजेडाची कवाडं उघडी केलीत. लाखोंना प्रकाषाची जाणीव आणि रंगांचा आनंद मिळवून देणारे हाताचे ठसे पुढच्या पाचशे वर्षातील पिढ्यांना केवळ बघायलाच मिळतील असे नाही तर भावी पिढ्यांना प्रेरणाही मिळवून देतील. 


तात्यारावांच्या हाताचे ठसे टिटवाळ्यातील वस्तुसंग्रहालयात लौकरच सर्वसामान्यांना बघण्यासाठी उपलब्ध होतील. तात्याराव यांचे ठसे मिळवण्यासाठी ॲड. जयेश वाणीसंजय पारेकर आणि ॲड. संजय भोजणे यांनी मेहनत घेतली.  तर मांडा-टिटवाळाकरांसाठी एक नवा सांस्कृतिक खजिना लवकरच खुला होणार असल्याची माहिती अविनाश हरड आणि प्रशांत गोडांबे यांनी दिली आहे.

टिटवाळ्यात नवा सांस्कृतिक खजिना लवकरच होणार खुला टिटवाळ्यात नवा सांस्कृतिक खजिना लवकरच होणार खुला   Reviewed by News1 Marathi on March 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads