Header AD

वालधुनी बचावा साठी नदीपात्रात मानवी साखळी जागतिक जल दिनी केले वालधुनी नदीचे पूजन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : जागतिक जलदिनाचे औचित्य साधून कल्याणमध्ये वालधुनी नदी बचावासाठी नदी पात्रात मानवी साखळी करण्यात आली. २२ मार्च हा जागतिक जल दिनवालधुनी नदी स्वच्छता समिती तर्फे अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी सचिव आर्किटेक्ट गणेश नाईक यांच्या संकल्पनेतूनवालधुनी नदी च्या पात्रात उतरून ११ सुवासिनींनी नदीची विधिवत पूजा केली.


शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी यापुढे कोणताही हलगर्जीपणा न करता पुढील काळात नदी स्वच्छता व संवर्धनासाठी लक्ष्य घालण्यासाठी सुबुद्धी देवो अशी प्रार्थना केली. या क्षेत्रात काम करणारे समितीचे प्रमुख मार्गदर्शक शशिकांत डायमा यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.  जन जन ने अब ठाना है! वालधुनी नदी.. अब बचाना है!! हा नारा दिला. शेवटी उपस्थितांकडून नदीच्या संरक्षणासाठी प्रतिकात्मक साखळी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नियोजन समितीचे कार्याध्यक्ष सुनिल उतेकर यांनी केले.


       या प्रसंगी वासंती जाधवसीता नाईकजयश्री सावंत, भरत गायकवाडविनोद शिरवाडकरपंकज डोईफोडे, मोटू जाधवविराज गायकवाडउषा दिसले, भक्ती साळवी, सुनिता भागवत, नयना नायरकरुणा झाल्टेस्मिता पवारकरुणा मिश्राआशीष तिवारी, कैलाश तवररामगणेश मिश्रापूनमचंद नाईकवंदना वर्मासंध्या फडतरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


वालधुनी बचावा साठी नदीपात्रात मानवी साखळी जागतिक जल दिनी केले वालधुनी नदीचे पूजन वालधुनी बचावा साठी नदीपात्रात मानवी साखळी जागतिक जल दिनी केले वालधुनी नदीचे पूजन Reviewed by News1 Marathi on March 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads