Header AD

डोंबिवली तील दुकाने सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत सुरु ठेवावी व्यापारी महा मंडळाची मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेचे गुरुवार ११ मार्च पासून संध्याकाळी ७ नंतर दुकाने बंद ठेवावे असे आदेश व्यापाऱ्यांना ठरवून दिलेली वेळ अन्यायकारक असल्याचे सांगत डोंबिवली व्यापारी महामंडळाने हि वेळ बदलत सकाळी ७ ते रात्री ७ हि वेळ बदलून ती सकाळी १० ते रात्री ९ अशी केली जावी अशी मागणी डोंबिवली व्यापारी महामंडळाने पालिका आयुक्तांकडे केली आहे.


 १० मार्च रोजी शहरातील करोना रुग्णाची संख्या जवळपास दुपटीने वाढत आहे. पालिका आयुक्तांनी  शहरात कडक निर्बंध लागू केले होते. यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ७ तर खानपान सेवा रात्री ९ पर्यत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र यानंतर खानपान सेवा रात्री ११ पर्यत सुरु ठेवण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्याने आयुक्तांनी या दुकानाच्या वेळा वाढवल्याबाबत शहरातील व्यापारी नाराज आहेत.


याबाबत डोंबिवली व्यापारी महामंडळाचे कार्यकारी प्रमुख दिमेश गोर म्हणाले, सकाळी ७ वाजता दुकानात खरेदीसाठी कोणीही येत नसल्यामुळे सकाळी ७ ते १० हे चार तास वाया जात असून ग्राहक संध्याकाळी काही प्रमाणात खरेदी करतात.यामुळे दुकानाच्या वेळेत बदल करावा सकाळी ७ ते संध्याकाळी ७ ऐवजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी.शनिवार आणि रविवारी सम विषम पद्धतीने सुरु ठेवण्याऐवजी आठवड्यातील एक दिवस सोमवार किवा बुधवार पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत.अत्यावश्यक सेवेतील दुकाने रात्री किती वाजेपर्यत सुरु ठेवावीत याचा तपशील देखील स्पष्ट करावा अशी मागणी डोंबिवली व्यापारी महामंडळाच्या वतीने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

डोंबिवली तील दुकाने सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत सुरु ठेवावी व्यापारी महा मंडळाची मागणी डोंबिवली तील दुकाने सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत सुरु ठेवावी व्यापारी महा मंडळाची मागणी Reviewed by News1 Marathi on March 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads