Header AD

वाढत्या कोरोना प्रादुर्भावा मुळे केडीएमसीत व्हिजिटर्सना नो एन्ट्री ईमेल द्वारे तक्रारी करण्याचे पालिकेचे आवाहन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात आपल्या तक्रारी आणि समस्या घेऊन येणाऱ्या व्हिजिटर्सना नो एन्ट्री करण्यात आली असून नागरिकांनी आपल्या तक्रारी ईमेल द्वारे संबंधित विभागाला करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.  


राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढत असल्याने आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली असुनकल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये कोविड-१९ बाधितांच्या संख्येमध्ये दिवसागणीक मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका कार्यालयामध्ये नसेच प्रभाग कार्यालयांमध्ये माजी पालिका सदस्यपदाधिकारी तसेच काही अभ्यांगत येत असतात. त्यांची संख्या मर्यादित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.


 प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेत येणाऱ्या अभ्यांगताच्या गर्दीवर नियंत्रण राखणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यांगतांना पुढील आदेश होईपर्यंत आवश्यक कामकाज वगळता प्रवेश मर्यादित करण्यात आला आहे. माजी पालिका सदस्य व पदाधिकारीविविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी यांना संबधित महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटणे जरुरीचे असल्यास प्रथमत: भ्रमणध्वनीवरुन संर्पक करावा. आवश्यकता भासल्यास महापालिका मुख्यालय अथवा प्रभाग कार्यालयात भेटीसाठी यावे.


नागरीकांनी त्यांच्या कामासाठी महापालिकेच्याwww.kdmc.gov.in या संकेतस्थळावर संबंधित विभागाशी ई-मेलव्दारे संपर्क करावा. अत्यंत तातडीचे टपालसंदेश हे ई-मेलव्दारे पाठविण्यात यावेत. महापालिकेच्या मुख्यालयात दैनंदिन टपाल व इतर महत्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सिस्टीम मॅनेजर यांनी नागरी सुविधा केंद्र येथे टपाल स्विकारण्याची व्यवस्था करावी. कोविड-१९ च्या अनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांसाठी होणाराअभ्यांगत दिन (visitor's day) तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आला आहे. महानगरपालिकेचा कर व अन्य देय रक्कमांसाठी नागरीकना डिजीटल ऑनलाईन सेवेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑफलाईन कर व तत्सम भरणा करण्यासाठी मर्यादित स्वरुपात महापालीकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये प्रवेश देण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी केल्या आहेत. 


वाढत्या कोरोना प्रादुर्भावा मुळे केडीएमसीत व्हिजिटर्सना नो एन्ट्री ईमेल द्वारे तक्रारी करण्याचे पालिकेचे आवाहन वाढत्या कोरोना प्रादुर्भावा मुळे केडीएमसीत व्हिजिटर्सना नो एन्ट्री ईमेल द्वारे तक्रारी करण्याचे पालिकेचे आवाहन  Reviewed by News1 Marathi on March 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads