Header AD

गुजरातच्या गांजा तस्कराला अटक करत १०० किलो गांजा जप्त महात्मा फुले चौक पोलिसांची कारवाई
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  गांजा तस्करीसाठी कल्याणात आलेल्या गुजरातच्या गांजा तस्कराला कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. विजय पटेल असे या गांजा तस्कराचे नाव असून त्याच्याकडून १०० किलो गांजा हस्तगत करण्यात आलं आहे.


गुजरात येथील गांजा तस्कर कल्याणात गांजा घेऊन येणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत विजय पटेल याला ताब्यात घेतलं, त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे १०० किलो गांजा आढळून आला. या गांजाची किंमत सुमारे १४ लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने गांजा कुठुन व कुणाला विकण्यासाठी आणला याचा पोलीस शोध घेत आहेत.


सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार, व.पो.नि. नारायण बानकर, पो.नि. संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक सरोदे, पो.हवा. विजय भालेराव, किरण शिर्के, पो.ना. सुनील भणगे, जे.जी.चौधरी, एस.एन.ठिकेकर, के.जी.जाधव, पो.शि. आर.एस. हासे, एस.आर.मधाळे, सोंगाळ यांनी केली आहे. 

गुजरातच्या गांजा तस्कराला अटक करत १०० किलो गांजा जप्त महात्मा फुले चौक पोलिसांची कारवाई गुजरातच्या गांजा तस्कराला अटक करत १०० किलो गांजा जप्त महात्मा फुले चौक पोलिसांची कारवाई Reviewed by News1 Marathi on March 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads