Header AD

कॅडबरी पुला खालील सुशोभी करण कामांची महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केली पाहणी
ठाणे , प्रतिनिधी  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत  कॅडबरी जंक्शन येथील  सुशोभीकरण कामाची आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली.

 

      कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रभागसमितीनिहाय स्वच्छेतेच्या कामाला प्राधान्य देण्यात आले असून आज महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी आदी ठिकाणांच्या साफसफाई तसेच सुशोभीकरण कामाची पाहणी केली.


     कोरोनाचा पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता अतिशय महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या काही दिवसापासून प्रत्येक प्रभागसमितीनिहाय साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले,  सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे आदी उपस्थित होते.      

कॅडबरी पुला खालील सुशोभी करण कामांची महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केली पाहणी कॅडबरी पुला खालील सुशोभी करण कामांची महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केली पाहणी Reviewed by News1 Marathi on March 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे...

भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात अ...

Post AD

home ads