Header AD

कचऱ्या मुळे रहेजा कॉम्प्लेक्स मध्ये साथीचे रोग पसरण्याची भीती

 

■कचरा न उचलल्यास कचऱ्याचे डब्बे पालिका मुख्यालयात आणणार - मनसेचा इशारा ....


कल्याण , कुणाल  म्हात्रे   एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण दिवसांदिवस वाढत असून दुसरीकडे महापालिका कचरा उचलण्यात दिरंगाई करीत आहे. त्यामुळे साथीचा रोग पसरण्याची भीती लोकांमध्ये दिसत आहे. वेळीच कचरा न उचलल्यास हे कचऱ्याचे डब्बे महापालिका मुख्यालयात आणून ठेवण्याचा इशारा मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी दिला आहे.


कल्याण पश्चिमेतील रहेजा कॉम्प्लेक्स येथे महापालिकेने काही दिवसापूर्वी विविध सोसायटीमध्ये कचऱ्याचे डब्बे मोठ्या प्रमाणात मोफत वाटले आहेत. मात्र मागील पाच दिवसापासून कचरा उचलला गेला नसल्याने पालिकेने दिलेले हे सर्व डब्बे कचऱ्याने भरलेले आहेत. यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.  स्थानिक रहिवासी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनीमहापालिकेच्या कारभारा वर टीका केली आहे. चोवीस तासात कचरा उचलला गेला नाही तर कचऱ्याचे सर्व भरलेले डब्बे महापालिका मुख्यालयात आणून ठेवण्याचा इशारा दिला आहे. 

कचऱ्या मुळे रहेजा कॉम्प्लेक्स मध्ये साथीचे रोग पसरण्याची भीती कचऱ्या मुळे रहेजा कॉम्प्लेक्स मध्ये साथीचे रोग पसरण्याची भीती Reviewed by News1 Marathi on March 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads