पालिकेच्या लसी करणाच्या धोरणा बाबत भाजपच्या माजी नगरसेवका कडून समाचार
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण – डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त दुसरीकडे लसीकरण संथगतीने सुरु आहे.यावर भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन डोंबिवली पुर्वेत लसीकरण केंद्र सुरु करण्याची जोरदार मागणी केली.पालिका आयुक्तांनी यावर लवकरच लसीकरणाचा वेग वाढवू असे आश्वासन दिले होते.मात्र प्रत्यक्षात यावर कोणतीही हालचाल होत नसल्याचे दिसत आहे.पालिका प्रशासनाने फक्त आश्वासन देऊ नये, लसीकरणाचा वेग वाढवावा अश्या शब्दात भाजपचे माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांनी पालिकेच्या धोरणाचा समाचार घेतला.
डोंबिवली पूर्वेत कोरोनाचा कहर अधिक वाढत आहे इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेने पूर्वेत अद्याप एकही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले नाही.डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु आहे. डोंबिवलीतील लोकसंख्येच्या प्रमाणात या केंद्रात अत्यंत संथगतीने लसीकरण होत आहे.तसेच हे केंद्र दूर असून या केंद्रात गर्दी असल्याने नागरीक जाण्यास टाळतात. शासनाच्या नियोजनानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला आगामी काळात कडक निर्बंधासह लसीकरणाचा वेग वाढवा लागेल.
तरच कोरोन आटोक्यात येईल.प्रशासनाने फक्त लसीकरणाचा वेग वाढवू असे आश्वासन देऊ नयेत.तर प्रत्यक्षात त्याची अमंलबजावणी बजावली करणे आवश्यक आहे.नागरिकांनी आपले कर्तव्य बाजाबत असताना दक्ष आणि सावध राहावे.मुखपट्टी वापरणे,लोकसंपर्क टाळावा,आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा.विविध मॉल मध्ये,गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँन्टीजन टेस्ट पालिकेने सुरु कराव्यात. त्याचप्रमाणे दोन दिवसांवर होळी आणि रंगपंचमी सण आले आहेत.हा सण साजरा करताना नागरिकांनी सावधानता बाळगली पाहिजे.
पालिकेने दुकानदारांना एक नियम आणि फेरीवाल्यांना वेगळे नियम यावर माजी नगरसेवक पवार यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले,स्टेशन परिसरात व्यापारी आणि दुकानदारांना पालिकेकडून सापत्न वागणूक मिळत आहे.फेरीवाले किंवा दुकानदार सर्वाना सारखे निर्बंध हवेत. तर थकबाकीदारांची वीज जोडणी तोडण्याबाबत आपले मत व्यक्त करताना पवार म्हणाले, थकीत वीजबिलांसाठी वीज जोडण्या कापली जात आहे.एेन उन्हाळ्याचा मोसम,विद्यार्थाच्या परीक्षांचे दिवस आणि कोरोना काळ यात वीज मंडळाने वीज जोडणी तोडणे कारवाईवर जनता संतापली आहे.भाजपने यावर आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढला होता.तरीही वीज जोडण्या कापल्या जात आहेत वीज मंडळाच्या या कारवाईची भाजप कडक शब्दात निषेध करत आहेत.वीजमहामंडळाने हि कारवाई थांबवली नाही तर भाजप आंदोलन करेल.

Post a Comment