Header AD

भाताच्या तुसाच्या गोणी खाली खैराची तस्करी

भिवंडी :दि.१ ( प्रतिनिधी )भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात आज ही मोठ्या प्रमाणावर खैराची जंगलतोड होत असून त्या बाबत नेहमीच ओरड होत आहे .नुकताच पडघा वनक्षेत्रपाल संजय धारवणे हे रात्रौ गस्त घालत असता त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत मुंबई नाशीक महामार्गावर एक संशयित वाहना मधून खैराची लाकडे तस्करी केली जात असल्याची माहिती समजली .त्यांनी तात्काळ उपवनसंरक्षक ठाणे व उपविभागीय वनाधिकारी मांडवी यांना या बाबत माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत वडपा परिमंडळ हद्दीत शंग्रीला हॉटेल च्या जवळ  एक संशयित वाहन उभे असल्याचे दिसून आल्याने वनक्षेत्रपाल संजय धारवणे यांनी सदरच्या संशयित वाहनाची तपासणी करणेकरीता ते जात असताना वाहन चालकास संशय आल्याने त्याने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास काही अंतरापर्यंत पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता चालकाने धावत्या गाडीतून उडी मारून पलायन केले.


सदर आयशर कंपनी चे वाहन क्र M H 09 /C U/ 0163 हा ट्रक ची वन परिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ताबा घेत जप्त केले वाहन ठाणे येथील उपवनसंरक्षक कार्यालयात आणून ठेवीत सदर ट्रक ची झडती घेतली असता या ट्रक मध्ये राईस मिल मधील भात भरडाई नंतर मागे राहणाऱ्या तुसाच्या गोणी ठेवलेल्या होत्या व त्याखाली खैर जातीचा सोलीव ताजा लाकूड साठा पाठीमागे रचून ठेवलेला दिसून आला. सदर मालाचे पंचा समक्ष मोजमाप घेत बाजारभाव प्रमाणे लाकडाचे व गाडीची किंमत धरून सुमारे १४ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे .


सदरची कारवाई उपवनसंरक्षक ठाणे गजेंद्र हिरे व उपविभागीय वनाधिकारी मांडवी श्रीमती गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पडघा येथील वन क्षेत्रपाल संजय धारवणे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल वडपा विलास निकम, वनपाल पडघा दिनेश माळी, वनपाल किरवली साहेबराव खरे, वनरक्षक जमीर इनामदार, विनोद सिल्व्हेरी, भाऊसाहेब आंबूर्लरकर, कार्यालयीन वनरक्षक संदीप पाटील, पडघा रेंज कार्यालय चे लेखापाल पंकज जाधव, पडघा रेंज कार्यालयीन कर्मचारी  महेंद्र भेरे, वाहन चालक  विकास उमतोल, वन मजूर भगवान सवर यांनी केली आहे .
भाताच्या तुसाच्या गोणी खाली खैराची तस्करी भाताच्या तुसाच्या गोणी खाली खैराची तस्करी Reviewed by News1 Marathi on March 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads