Header AD

कल्याण डोंबिवली तील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी घेतली आढावा बैठक


■केंद्राकडून राज्याला कोवीड लसींचा पुरवठा वाढवणे आवश्यक - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुनरुच्चार....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवलीतील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात एका संयुक्तिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतला.  


सध्या ज्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्या वेगाने कोवीड लसीकरण होणे गरजेचे बनले असून केंद्राकडून महाराष्ट्राला होणाऱ्या कोवीड लसींच्या पुरवठ्यामध्ये वाढ होणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. आढावा बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा पुनरुच्चार केला.


कल्याण डोंबिवलीमध्ये मधल्या काळात लक्षणियरित्या कमी झालेला कोरोना पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला आहे. याचे प्रमूख कारण म्हणजे लोकांना पुरेशा प्रमाणात लसीकरण होत नाहीये. वाढते कोरोना रुग्ण पाहता कल्याण डोंबिवलीत कोवीड लसीकरण आणि लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र केंद्राकडून जोपर्यंत लसींचा पुरवठा वाढवला जात नाही तोपर्यंत केंद्र वाढवून काहीही उपयोग नसल्याकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले. अधिकाधिक लोकांचे लसीकरण करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा केडीएमसीकडे तयार असून लवकरात लवकर लस उपलब्ध होणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


तर वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असणारे बेड भरू लागले आहेत. त्यामूळे जास्तीचे बेड उपलब्ध होण्यासाठी खासगी रुग्णालयातील बेड पूर्वीप्रमाणे ताब्यात घेण्यासह पाटीदारसारखे मोठे कोवीड सेंटर सुरू करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. या बैठकीत वाढते कोरोना रुग्णत्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगउपलब्ध बेड आणि भविष्यात आवश्यक असणारी बेडसंख्याकोवीड लसीकरणलसीकरणाची केंद्र वाढवणेसर्व आजी-माजी लोकप्रतिनिधीना या मोहिमेत समावेश करणे आदी महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.

कल्याण डोंबिवली तील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी घेतली आढावा बैठक कल्याण डोंबिवली तील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खासदारांनी घेतली आढावा बैठक Reviewed by News1 Marathi on March 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads