Header AD

एमजी मोटरद्वारे सर्वाधिक उत्पादन, बुकिंग आणि विक्रीची नोंद


फेब्रुवारी महिन्यात केली ४,३२९ युनिटची विक्री ~


मुंबई, १ मार्च २०२१ : एमजी मोटर इंडियाने फेब्रुवारी २०२१ मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रिटेल विक्री ४,२३९ युनिट एवढी नोंदवली. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वृद्धी २१५% एवढी आहे. ब्रिटिश वारसा असलेल्या या कारनिर्मात्या कंपनीला महिन्यात सर्वाधिक उत्पादन, बुकिंग आणि विक्रीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला. यात झेडएस ईव्ही, हेक्टर आणि ग्लॉस्टर यांचा समावेश आहे.


सध्या ही वाहननिर्माता कंपनी भारताला ‘एमजी झेडएस ईव्हीसोबत अधिक स्वच्छ आणि हरित भविष्याच्या दिशेने नेत आहे. वाहनाचा २०२१ हा पर्याय, झेडएस ईव्ही २०२१ हा एचटी बॅटरीसह येतो. या महिन्यात त्याला जानेवारी महिन्याच्या तुसनेत जवळपास दुप्पट म्हणजे ३५ पेक्षा जास्त ऑर्डर्स मिळाल्या.


एमजीने या वर्षी सर्वात नवी हेक्टर २०२१ लाँच केली असून त्यात सीव्हीटी पर्याय, कँपेंज ब्लॅक इंटेरिअर, ड्युएल टोन एक्सटेरिअर आणि इतर बदल केले आहेत. फेब्रुवारी महिन्यात, वितरण साखळीत आव्हाने असूनही ग्लोस्टरचे उत्पादन निरंतर वाढत राहिले.


एमजी मोटर इंडियाचे विक्री संचालक श्री राकेश सिदाना म्हणाले, “२०२१ मधील उत्पादनांची सर्वाधिक विक्री ही प्रेरणादायी आहे. आता जास्तीत जास्त शहरांमध्ये आम्ही चार्जिंगच्या सुविधा वाढवत असल्याने ईलेक्ट्रॉनिक वाहनांता ट्रेंड वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. ही गती मार्च महिन्यातही कायम राहण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही ग्राहकांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”


कंपनीने भारतात अनेक सुविधा पहिल्यांदाच प्रदान केल्या आहेत. यात भारतातील पहिली इंटरनेट कार- एमजी हेक्टर, भारतातील पहिली प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही एमजी झेडएस ईव्ही, आणि भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल1) प्रीमियम एसयूव्ही एमजी ग्लॉस्टर यांचा समावेश आहे.


एमजीने नुकतेच, सर्व महिला क्रूंच्या मदतीने, गुजरातमधील वडोदऱ्यातील प्रकल्पात ५०,००० वी हेक्टर तयार झाल्याचा क्षण साजरा केला. वैविध्य हे वाहन निर्माता कंपनीचे मूलभूत तत्त्व असून याअंतर्गत ३३% पेक्षा जास्त महिला श्रमशक्तीस संधी देण्यात आली आहे. या क्षेत्रात हे सर्वाधिक प्रमाण आहे. या कंपनीत उद्योगातील सर्व विभागात महिला पुरुष सहकाऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतात.


एमजी मोटरद्वारे सर्वाधिक उत्पादन, बुकिंग आणि विक्रीची नोंद एमजी मोटरद्वारे सर्वाधिक उत्पादन, बुकिंग आणि विक्रीची नोंद Reviewed by News1 Marathi on March 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads