Header AD

कल्याणच्या डम्पिंग वरील आगीचे धुमसणे सुरूच आग विझवण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :-   कल्याणातील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला काल रात्री लागलेली आग अद्यापही धूमसत असुन काल रात्रीपेक्षा सध्या ही  आग नियंत्रणात आली असली तरी पूर्णपणे विझण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. एकीकडे वाढत चाललेला उन्हाचा तडाखा आणि प्रचंड मोठ्या भागात पसरलेली आग पाहता कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आणि त्याला लागणाऱ्या आगीचा प्रश्न कल्याण डोंबिवलीकरांसाठी तसा काही नवीन नाही.


             मात्र गेल्या दोन वर्षांत डम्पिंगच्या आगीच्या घटनांमध्ये लक्षणियरित्या घट झाली होती. गेल्यावर्षी म्हणजेच जानेवार२०२० नंतर मंगळवारी रात्री याठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र मगंळवारचा आगीचा प्रकार काहीसा मोठा असून सुमारे ३ ते ४ एकर कचरा परिसरातील कचऱ्याला आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत आहे.                  मंगळवारी रात्रीपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाच्या ६ गाड्या आणि १२ पाण्याच्या टँकरच्या मदतीने विनाखंडपणे अग्निशमन दल या आगीशी झुंजत आहे. तर आगीचे गांभीर्य लक्षात घेता केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे काल रात्रभर घटनास्थळी उपस्थित होते. ही आग नेमकी लागली की लावली याबाबत आताच भाष्य करणे चुकीचे असून सखोल चौकशीनंतर ते स्पष्ट होईलअसे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.                   तर आग नियंत्रणात असून केवळ धूर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र वाऱ्यामुळे पुन्हा ही आग भडकण्याची शक्यता असून ६ गाड्या आणि पाण्याच्या टँकरच्या मदतीने अग्निशमन दल ही आग विझवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करत आहे. ती पूर्णपणे विझण्यासाठी बुधवारची संध्याकाळ होऊ शकते अशी प्रतिक्रिया मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली.
दरम्यान वर्षभराच्या कालावधीनंतर कल्याण डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग लागली असून हा प्रश्न कायमचा नेमका केव्हा निकाली निघेल असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
कल्याणच्या डम्पिंग वरील आगीचे धुमसणे सुरूच आग विझवण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता कल्याणच्या डम्पिंग वरील आगीचे  धुमसणे सुरूच आग विझवण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता Reviewed by News1 Marathi on March 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिन सेवा सप्ताह अंतर्गत महिला स्वसंरक्षण ( Self Defence ) शिबिर संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  :   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जन्मदिन सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व डॉ. राजेश मढवी...

Post AD

home ads